Join us  

Anupama Spoiler Alert: अनुपमा आणि अनुजचं लग्न मोडणार?, हा व्यक्ती ठरला कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 1:48 PM

'अनुपमा' (Anupama) मालिकेत असा एकही दिवस जात नाही ज्यादिवशी नवा ट्विस्ट येत नाही. वनराज आणि बा मिळून शहा कुटुंबात गोंधळ निर्माण करतात.

Anupama 11 May Episode:  'अनुपमा'  (Anupama) मालिकेत असा एकही दिवस जात नाही ज्यादिवशी नवा ट्विस्ट येत नाही. वनराज आणि बा मिळून शहा कुटुंबात गोंधळ निर्माण करतात. दोघांनीही अनुपमाचे लग्न उद्ध्वस्त करण्याची जणू शपथच घेतली आहे.  सध्या या मालिकेत काय सुरू आहे तर अनुपमा आणि अनुज यांची संगीत आणि मेहंदी सेरेमनी संपता संपत नाहीये. अनुपमा व अनुजच्या लग्नांच्या विधीत विघ्न पडतं. संगीत सेरेमनी दरम्यान बापूजींची प्रकृती बिघडते.  दुसरीकडे अनुपमाचा आनंद पाहून वनराज चिडतो. दरम्यान, अनुपमा या मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. बापूजींमुळे वनराज आपला राग अनुपमावर काढणार आहे.

अनुज आणि अनुपमा यांची लव्हस्टोरी रिक्रिकेट करणार आहेत. यादरम्यान काव्या अनुपमाच्या आईची भूमिका साकारणार आहे. अनुज काव्याकडेअनुपमाचा हात मागण्यासाठी जाणर आहे. अनुजची अवस्था पाहून अनुपमाला रडू येईल तर दुसरीकडे, अनुजचे प्रेम पाहून काव्यालाही आश्चर्य वाटेल.

सेरेमनी रंगात आली असतानाच बापूजी चक्कर येऊन पडतील. बापूजी बेशुद्ध झाल्यावर पुन्हा सगळीकडे टेन्शन वाढेल. मग काय, संगीत सेरेमनी सोडून शाह कुटुंब रूग्णालयात पळेल. वनराजचा राग आणखी वाढेल आणि रागाच्या भरात तो अनुपमाला यासाठी जबाबदार ठरवेल. तुझ्याचमुळे बापूजींची ही अवस्था झालीये, असं म्हणत तो अनुपमाला नको ते बोलेल. इतकंच नाही तर शाह हाऊसमध्ये अनुपमाचं लग्न होऊ देणार नाही,असं बोलून पुन्हा एकदा टेन्शनमध्ये भर घालेल.

अनुपमा बापूजींना शस्त्रक्रियेसाठी तयार करण्याचा प्रयत्न करेल.  बापूजी त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यास नकार देतील. बापूजी म्हणतील की अनुपमाच्या लग्नाआधी त्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही. बापूजींचे बोलणे ऐकून अनुपमाला राग येईल. बापूजींनी शस्त्रक्रिया न केल्यास अनुजसोबतचे लग्न मोडणार असल्याचे अनुपमा जाहीर करेल. हे ऐकून बापूजींना धक्काच बसेल.

बापूजी आजारी पडल्यावर वनराज आणि अनुज पुन्हा एकदा समोरासमोर येतील. वनराज, अनुज आणि अनुपमाला त्यांच्या घराबाहेर जायला सांगेल. अशा परिस्थितीत अनुपमा कुठे लग्न करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्लस