Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझे फोटो काढू नका'; 'या' कारणामुळे रुपाली गांगुलीवर आली तोंड लपवायची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 19:31 IST

Rupali ganguly: 'अनुपमा' या मालिकेमुळे रुपाली प्रचंड प्रकाशझोतात आली आहे. त्यामुळे रुपाली कोणत्याही ठिकाणी स्पॉट झाली की चाहते वा फोटोग्राफर्स तिची एक छबी कॅमेरात कैद करण्यासाठी पुढे सरसावतात.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रुपाली गांगुली (rupali ganguly) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. तिची मुख्य भूमिका असलेली 'अनुपमा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून या मालिकेमुळे रुपाली प्रचंड प्रकाशझोतात आली आहे. त्यामुळे रुपाली कोणत्याही ठिकाणी स्पॉट झाली की चाहते वा फोटोग्राफर्स तिची एक छबी कॅमेरात कैद करण्यासाठी पुढे सरसावतात. सध्या असाच एक किस्सा तिच्या सोबत घडला आहे. अलिकडेच रुपालीला एका सॅलॉन बाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिला पाहिल्यानंतर अनेक फोटोग्राफर्स तिचे फोटो घेण्यासाठी पुढे सरसावले. परंतु, कॅमेरा पाहताच रुपालीने तिचा चेहरा झाकत तेथून पळ काढायचा प्रयत्न केला. 

काही दिवसांपूर्वीच रुपाली मुंबईतील एका सॅलॉनमध्ये गेली होती. यावेळी ती सॅलॉनमधून बाहेर पडल्यावर छायाचित्रकारांनी तिला घेरलं आणि तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली.  परंतु, तिने फोटो काढण्यास मनाई केली. इतकंच नाही तर तिने फोटो काढण्यास नकार का दिला यामागचं कारणही सांगितलं. 

"प्लीज, माझे फोटो काढू नका. मी केसांना तेल लावलंय", असं म्हणत रुपालीने फोटो काढण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तिने हाताने तिचा चेहरा लपवण्याचाही प्रयत्न केला. 

दरम्यान, रुपालीचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. यात अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. तर अनेक स्त्रियांनी तिची बाजू घेतली आहे. 'तेलच लावलंय ना,मग यात गुन्हा काय? आणि जर असं असेल तर तेल लावलंच का?', असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर, 'तेल लावून फोटो काढणं खरंच बरोबर दिसत नाही', असं म्हणत काही नेटकऱ्यांनी तिची बाजू घेतली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकार