अन्नू मलिक सांगतोय, इंडियन आयडलमध्ये काहीही स्क्रिप्टेड नसते
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 15:21 IST
इंडियन आयडलमध्ये स्पर्धकांवरून परीक्षकांमध्ये झालेली भांडणे काही नवीन नाहीत. इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वात सोनू निगम, अन्नू मलिक आणि फराह ...
अन्नू मलिक सांगतोय, इंडियन आयडलमध्ये काहीही स्क्रिप्टेड नसते
इंडियन आयडलमध्ये स्पर्धकांवरून परीक्षकांमध्ये झालेली भांडणे काही नवीन नाहीत. इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वात सोनू निगम, अन्नू मलिक आणि फराह खानने परीक्षकाची भूमिका साकारली होती. या पर्वातील त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. या पर्वात काही गोष्टींवर त्यांचे एकमत न झाल्याने त्यांच्यात झालेले वाददेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. यंदाच्या इंडियन आयडलच्या पर्वात अनू, सोनू आणि फराह अनेक वर्षांनंतर एकत्र आले आहेत. तिघे या पर्वात परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहेत. हे तिघे पुन्हा एकत्र येणार म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात काहीतरी मतभेद होणार हे तरी नक्की...इंडियन आयडलमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी, कार्यक्रमाचा टिआरपी मिळवण्यासाठी परीक्षक एकमेकांसोबत भांडतात असा आरोप त्यांच्यावर अनेकवेळा करण्यात येतो. याबाबत अनू सांगतो, "इंडियन आयडलमध्ये प्रेक्षकांना जे काही पाहायला मिळते ते सगळे खरे असते. हा स्क्रिप्टेड कार्यक्रम नाहीये. जिथे मी असतो तिथे कधीच टेलिप्रोम्पटर नसतो. त्यामुळे माझ्या ओळी दुसऱ्या कोणीतरी लिहून देणे हे अशक्यच आहे. आमच्यात होणारी भांडणे अथवा आम्ही चित्रीकरणाच्या वेळी रागाने निघून जातो हे सगळे खरे असते. मी, सोनू आणि फराह आम्ही तिघेही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काय बोलयचे असे काहीही ठरवत नाही. चित्रीकरण सुरू असताना आम्हाला जे काही उत्सफूर्तपणे सुचते, तेच आम्ही बोलतो. अनेक वेळा आमच्यात वाद होतात. पण काहीच वेळात आम्ही तिघेही एकमेकांना अलिंगन देतो आणि आमच्यातली भांडणे विसरून जातो.