...आणि सलमान खानने प्रियांका जग्गाला काढले घराच्या बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 17:58 IST
बिग बॉसच्या इतिहासात जी गोष्ट कधीच घडली नव्हती, ती पहिल्यांदाच आता घडली आहे. या मालिकेचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान ...
...आणि सलमान खानने प्रियांका जग्गाला काढले घराच्या बाहेर
बिग बॉसच्या इतिहासात जी गोष्ट कधीच घडली नव्हती, ती पहिल्यांदाच आता घडली आहे. या मालिकेचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. आतापर्यंत अनेक सिझनध्ये सलमान आणि स्पर्धकांचे वाद झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. सलमानला एखाद्या स्पर्धकाचे वागणे पटत नसेल तर तो त्याला चांगलाच सुनावतो. याचमुळे सलमान काही स्पर्धकांची बाजू घेतो असादेखील आरोप त्याच्यावर नेहमीच करण्यात येतो. पण सलमानने नेहमीच याकडे दुर्लक्ष केले आहे. सलमानचे आतापर्यंत अनेक स्पर्धकांसोबत वाद झाले असले तरी कोणत्याही स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले जावे असे सलमानने मत व्यक्त केले नव्हते. पण यंदाच्या सिझनमध्ये सलमानमुळे प्रियांका जग्गाला घराच्या बाहेर काढण्यात आले आहे.प्रियांका नेहमीच सगळ्यांसोबत वाद घालत असते. अनेक वेळा ती लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावरून त्यांना टोमणे मारते. काही दिवसांपूर्वी झालेल्या भागात प्रियांकाने लोपामुद्रा राऊत आणि मनू पंजाबी यांच्या आईविषयी काही टिप्पणी केल्या होत्या. हे सगळे ऐकल्यानंतर सलमान प्रचंड भडकला होता. प्रियांकाला यावरून त्याने चांगलेच खडसावले होते. पण प्रियांकाला याचा काहीच फरक पडला नाही. याउलट तिने सलमानशीच हुज्जत घातली. त्यावेळी सलमानने चिडून सांगितले की, प्रियांकाने घरातून निघून जावे. नाहीतर तो कलर्स या वाहिनीचा भाग कधीच बनणार नाही. सलमानचा हा रौद्र अवतार पाहून प्रियांकाकडे घर सोडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. प्रियांकाच्या जाण्याने एक ऐतिहासिक गोष्ट बिग बॉसच्या घरात घडली आहे.