Join us

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये रंजक वळण, अधिपति चारुलताच्या मातृप्रेमाला शरण जाईल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:13 IST

Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरूच आहेत.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या जोडीनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता या मालिकेत रंजक वळण आले आहे. 

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरूच आहेत. चारुहास चारुलताला घेऊन पहिल्यांदा त्यांच्या शाळेत जातो. तिथे भुवनेश्वरी विद्यामंदीर हा बोर्ड पाहून चारुहास तो बोर्ड बदलून त्याला चारुलता विद्यामंदीर करण्याचा निर्णय घेतो. पण अक्षरा ह्यावर त्यांना पुन्हा नीट विचार करायला सांगते कारण ह्या कृतीने अधिपती चिडणार ह्यावर तिला खात्री आहे. 

दुसरीकडे चारुलता अधिपतीला फॅक्टरीमध्ये डबा पाठवते. मिसळ पाहून अधिपतीचा चेहरा खुलतो मात्र जेव्हा त्याला हे कळतं की हा डबा चारुलताने पाठवला आहे तेव्हा तो प्रचंड चिडतो. चारुलताला तो स्पष्ट सांगतो की त्याची आई होण्याचा प्रयत्न करु नकोस. घरात ह्यामुळे पुन्हा दुषीत वातावरण होतंय. भुवनेश्वरीला शोधण्याचे अधिपतीचे प्रयत्न पुन्हा जोर धरु लागतात. अधिपती आणि चारुलता मध्ये आई-मुलाचं नातं निर्माण होईल का? चारुहास, शाळेचा बोर्ड चारुलताच्या नावावर बदलेल का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :झी मराठी