Join us

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, नियती सारंग आणि सावलीला एकत्र आणेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 18:17 IST

Savlyachi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सध्या सावली आणि सारंगची गोष्ट एक मनोरंजक वळण घेत आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सध्या सावली आणि सारंगची गोष्ट एक मनोरंजक वळण घेत आहे. सारंगला फोन येतो की त्यांच्या कंपनीच्या नावाखाली डुप्लिकेट प्रॉडक्ट्स विकले जात आहेत. सावली मैत्रिणीच्या हळदीला आलेली असताना सगळ्यांच्या आग्रह खातर ती गाणं गाते. तिच्या गाण्याचे सूर सारंगच्या कानावर पडतात आणि तो त्याला ताराचा आवाज समजून आवाजाचा शोध घेत त्या घराजवळ पोहोचतो. सावली सारंगला पटवून देते की ताराचं रेकॉर्डेड गाणं वाजत होतं. सारंग डुप्लिकेट प्रोडक्ट्स बनत असलेल्या गोडाऊनला पोहोचतो आणि गुंडांना बेदम मारतो, गोडाऊनच्या बाहेर सारंगची मारामारी सुरू असताना एक लहान मुलगी आगीमध्ये अडकलेय. सावली आणि सारंग एकत्र तिला वाचवतात. 

जगन्नाथ, तिलोत्तमाला सांगतो की सारंगच्या लग्नाचा योग आहे आणि लवकरच ती मुलगी त्याच्या आयुष्यात प्रवेश करेल. भैरवीला सावली हळदीमध्ये गायल्याचं कळतं, भैरवी सारंग आणि सावलीला एकत्र बघते आणि अजून भडकते. सावलीच घराणं संगीत कलेशी निगडित आहे म्हणून सावलीला सारंग गाणं म्हणायला सांगतो, पण सावली तिला गाणं येत नसल्याचं सांगते. भैरवी सावली ला नियम मोडला म्हणून खडसावते, सावली शपथ घेते की असा परत होणार नाही.

तिलोत्तमा घरच्यांना सारंगसाठी मुलगी शोधण्याच्या निमित्ताने ब्युटी काँटेस्ट आयोजीत करत असल्याचं सांगते.  नियती सारंग आणि सावलीला एकत्र आणेल ? भैरवी, सावलीने नियम मोडल्यामुळे काय शिक्षा ऐकवेल? हे पाहणे कमालीचे ठरेल.