Join us

​अमृता का घाबरली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 16:48 IST

पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के या मालिकेत अमृता पुरी हरलीन कौर ही भूमिका साकारत आहे. हरलीनच्या पतीचे निधन 17 वर्षांपूर्वी कारगिलच्या ...

पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के या मालिकेत अमृता पुरी हरलीन कौर ही भूमिका साकारत आहे. हरलीनच्या पतीचे निधन 17 वर्षांपूर्वी कारगिलच्या युद्धात झालेले आहे असे दाखवण्यात आलेेले आहे. पतीच्या निधनानंतर संपूर्ण घराची जबाबदारी तिने सांभाळलेली आहे. या भूमिकेसाठी अमृता टक्क ट्रॅक्टर चालवायला शिकली आहे. ट्रॅक्टर चालवायला शिकणे हा अनुभव तिच्यासाठी खूपच भयानक होता असे तिचे म्हणणे आहे. अमृता सांगते, "या मालिकेचे निर्माते निखिल अडवाणी यांनी या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी मला ट्रॅक्टरवर बसायचे आहे असे सांगितले होते. पण ट्रॅक्टर मला चालवायला लागणार आहे असे त्यांनी सांगितले नव्हते. ज्यावेळी मला ट्रॅक्टर चालवायचा आहे असे सांगण्यात आले, तेव्हा मी खूप घाबरले होते. मला गाडी चालवायला येते. पण गाडी चालवणे आणि ट्रॅक्टर चालवणे यात खूप फरक आहे. मला ट्रॅक्टर कसा चालवायचा हे चित्रीकरणाच्याआधी शिकवण्यात आले. पण ट्रॅक्टर कॅमेऱ्यासमोर चालवायला मला खूप भीती वाटत होती. कारण गियर बदलण्यासाठी मला उठावे लागत होते. त्यामुळे दृश्य सुरू व्हायच्या आत एक व्यक्ती गियर बदलून देत असे आणि शॉर्ट सुरू झाला की तो शेतात उडी मारत असे. तसेच माझ्यासोबत एक लहान मुलगाही या दृश्यात होता. त्याला माझ्यामुळे दुखापत होईल असे मला सतत वाटत होते. तरीही घाबरत मी ट्रॅक्टर चालवला. पण त्यानंतर ट्रॅक्टरवर उभे राहून मला भांगडा करायचा असे सांगण्यात आले. त्यावेळी तर मला घामच फुटला होता. मला हे जमणारच नाही असे मी निखिल यांना सांगितले. पण काहीही पर्याय नसल्याने घाबरत घाबरतच मी या दृश्याचे चित्रीकरण पूर्ण केले. या दृश्यात माझे क्लोज अप शॉर्ट नसल्याने मी किती घाबरले होते हे कोणालाही कळले नाही."