Join us

अमनला अश्रू आवरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 16:10 IST

एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा या मालिकेत अमन वर्मा शेखरन शेट्टी उर्फ अण्णा ही भूमिका साकारत ...

एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा या मालिकेत अमन वर्मा शेखरन शेट्टी उर्फ अण्णा ही भूमिका साकारत आहे. पण आता या मालिकेला तो रामराम ठोकणार आहे. या मालिकेतील कथानकानुसार त्याची व्यक्तिरेखा आता संपवली जाणार आहे. अमनने नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले. या मालिकेच्या सगळ्या टीमचा निरोप घेताना अमनला त्याचे अश्रू आवरत नव्हते. या मालिकेविषयी अमन सांगतो, "शेखरन शेट्टी ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. मला दाक्षिणात्य शैलीत काही संवाद बोलायचे होते. त्यासाठी मालिकेच्या टीमने मला खूप मदत केली. तसेच या मालिकेमुळे मला तेलगू या भाषेतील काही शब्ददेखील कळले. या माझ्या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. प्रेक्षकांनी नेहमीच मला खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. यासाठी मी त्यांचा आभारी आहे."