अक्षका पुन्हा प्रेमात पडली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 17:20 IST
अक्षका गरोडिया आणि रोहित बक्षी हे दोघे जवळजवळ 10 वर्षं तरी नात्यात होते.पण नुकतेच त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम देण्याचे ...
अक्षका पुन्हा प्रेमात पडली?
अक्षका गरोडिया आणि रोहित बक्षी हे दोघे जवळजवळ 10 वर्षं तरी नात्यात होते.पण नुकतेच त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले. त्यांच्यात सतत होत असलेल्या भांडणांमुळे त्यांनी ब्रेकअपचे केले असल्याचे म्हटले जात आहे. ब्रेकअपनंतर अक्षका पुन्हा प्रेमात पडली असल्याची सध्या चर्चा आहे. अक्षकाने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये एक फिरंगी मुलगा तिच्यासोबत दिसत आहे. या फोटोसोबत माझा गमावलेला विश्वास परत मिळवणारा हा माझा साथीदार असल्याचे तिने लिहिले आहे. त्यामुळे अक्षका पुन्हा प्रेमात पडलीय का असा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे.