Join us

अक्षय म्हात्रे पिया अलबेलासाठी झोपला खिळ्यांच्या पलंगावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 10:52 IST

अक्षय म्हात्रे पिया अलबेला या मालिकेत नरेन ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेची चांगलेच कौतुक होत आहे. ...

अक्षय म्हात्रे पिया अलबेला या मालिकेत नरेन ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेची चांगलेच कौतुक होत आहे. अक्षय त्याच्या भूमिकेसाठी नेहमीच मेहनत घेत असतो. या मालिकेतील त्याची भूमिका अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी त्याने त्याच्या जीवनशैलीतही अनेक बदल केले आहेत. त्याच्या या कामावर मालिकेचे निर्माते सूरज बडजात्यादेखील खूपच खूश आहेत. अक्षयने या मालिकेसाठी नुकतेच एका अतिशय कठीण प्रसंगाचे चित्रीकरण केले. या मालिकेत नरेन पूजाच्या म्हणजेच शीनाच्या कपाळात कुंकू भरण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचवेळी पूजा त्याचा हात झटकते असे आपल्याला पाहायला मिळाले होते. आपल्या या कृतीचे गांभीर्य लक्षात आल्यावर नरेन प्रायश्चित्त करण्याचे ठरवतो. तो स्वतःला खिळ्यांच्या पलंगावर झोपवतो. या प्रसंगासाठी अक्षयने बॉडी डबलची मदत घ्यावी असे मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. पण बॉडी डबलची मदत न घेता मीच स्वतः हा प्रसंग करणार यावर अक्षय ठाम होता. त्याला 10 हजार खिळे लावलेल्या पलंगावर झोपताना पाहून साऱ्यांना खूप आश्चर्य वाटले होते. याविषयी अक्षय सांगतो, आपल्या हातून काही चूक झाल्यावर नरेन नेहमीच स्वतःला काही ना काही शिक्षा देतो असे आपल्याला मालिकेत आजवर दाखवण्यात आले आहे. आताही आपल्याकडून चूक झाल्याने तो खिळ्यांच्या पलंगावर झोपणार आहे. तब्बल 10 हजार खिळे ठोकलेला हा पलंग या प्रसंगासाठी सुताराकडून बनवून घेण्यात आला होता. खिळे टोचून माझ्या शरीराला दुखापत होऊ नये म्हणून खिळ्यांची टोके काहीशी बोथट केलेली होती. तरीही त्या पलंगवार झोपल्यानंतर खूपच त्रास होत होता आणि त्या वेदना माझ्या चेहऱ्यावर दिसत होत्या. त्यामुळे मला या दृश्यासाठी कोणताही अभिनय करावा लागला नाही.