अक्षय खन्नाला सारेगमप लिटिल चॅम्पसमध्ये का अावरले नाही अश्रू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 14:53 IST
सारेगमप लिटिल चॅम्पसमध्ये सगळेच चिमुरडे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. या चिमुरड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दर आठवड्याला एखादा ...
अक्षय खन्नाला सारेगमप लिटिल चॅम्पसमध्ये का अावरले नाही अश्रू?
सारेगमप लिटिल चॅम्पसमध्ये सगळेच चिमुरडे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. या चिमुरड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दर आठवड्याला एखादा कलाकार या कार्यक्रमाच्या सेटवर उपस्थित राहात असतो. या कार्यक्रमात नुकतीच अक्षय खन्नाने उपस्थिती लावली होती. अक्षय खन्ना गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण सध्या तो मॉम या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी सध्या तो जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानेच तो सारेगमपच्या सेटवर गेला होता. अक्षय या कार्यक्रमात खूपच हँडसम दिसत होता. कार्यक्रमात त्याच्यासोबत श्रीदेवीने देखील हजेरी लावली होती. सगळ्या स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहून ते दोघेही थक्क झाले होते. त्यांनी सगळ्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमात टिकू या स्पर्धकाने गायलेल्या गाण्यामुळे अक्षय खन्ना खूपच भावूक झाला. टिकूने विनोद खन्ना यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले लोकप्रिय गीत रुक जाना नही तू कही हार के हे गाणे सादर केले. ते ऐकून अक्षयच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या गाण्याने त्याच्या मनाला स्पर्श केला. या परफॉर्मन्सविषयी अक्षय सांगतो, रुक जाना नही हे गाणे माझ्या वडिलांचे आवडते गाणे होते. ते टिकू या स्पर्धकाने खूपच छान प्रकारे गायले. हे गाणे ऐकताना मी मंत्रमुग्ध झालो होतो. नेहा कक्कर, हिमेश रेशमिया, अली या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या तिघांनादेखील टिकूचा परफॉर्मन्स खूपच आवडला. तसेच श्रीदेवीनेदेखील टाळ्या वाजवून त्याच्या परफॉर्मन्सला दाद दिली. Also Read : सारेगमपा लिटल चॅम्पसचा सूत्रधार आदित्य नारायण केवळ टॉवेलवर पोहोचला होता लग्नात