Join us  

अजब प्रेम की गजब कहानी फेम दर्शन जरीवालाच्या पत्नी आहेत क्योंकी साँस भी कभी बहू थी मधील या अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 5:50 PM

तुम्हाला माहीत आहे का, क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्री दर्शन यांच्या पत्नी आहेत.

ठळक मुद्देदर्शन आणि अपरा यांचे लग्न 1981 मध्ये झाले होते. त्यांना खुशाली मेहता ही मुलगी असून गेल्या काही वर्षांपासून खुशाली आपल्या आईसोबत राहात आहेत. अपरा आणि दर्शनचे लग्न झाले त्यावेळी त्या दोघांचेही वय खूप कमी होते.

अजब प्रेम की गजब कहानी हा रणबीर कपूर आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आपल्याला दर्शन जरीवाला यांना पाहायला मिळाले होते. दर्शनने याआधी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अपरा मेहता या दर्शन यांच्या पत्नी आहेत. पण ते दोघे गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहेत. 

दर्शन आणि अपरा यांचे लग्न 1981 मध्ये झाले होते. त्यांना खुशाली मेहता ही मुलगी असून गेल्या काही वर्षांपासून खुशाली आपल्या आईसोबत राहात आहेत. अपरा आणि दर्शनचे लग्न झाले त्यावेळी त्या दोघांचेही वय खूप कमी होते. अपरा 18 तर दर्शन 21 वर्षांचे होते. लग्नानंतर काही वर्षं त्यांचे एकमेकांशी खूपच चांगले पटत होते. पण नंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि 2004 पासून ते वेगवेगळे राहू लागले. अपरा आणि दर्शन वेगळे राहात असले तरी ते आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांच्या आयुष्यात काही प्रोब्लेम आले तर ते दोघे एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहातात. 2007 मध्ये अपराच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळी दर्शनने अपराला या दुःखातून बाहेर पडायला मदत केली होती. 

अपरा आणि दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात आहेत. पण त्यांची मुलगी खुशालीच्या जन्मानंतर दोघांपैकी एकाने घरी राहायचे आणि एकाने काम करायचे असे त्यांचे ठरलेले होते. त्यांच्यात कितीही प्रोब्लेम्स असले तरी त्याचा परिणाम त्यांनी त्यांच्या मुलीवर होऊन दिला नाही.

अपरा मेहताने एक महल हो सपनो का या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला सुरुवात केली. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली सविता विराणी ही भूमिका चांगलीच गाजली होती. 

 

टॅग्स :रणबीर कपूरकतरिना कैफ