Join us  

अजा-शनाया थिरकले 'टिप टिप बरसा...' गाण्यावर, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 1:29 PM

नितीश चव्हाण (Nitish Chavan) आणि रसिका सुनील (Rasika Sunil) एकत्र एका प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत मात्र त्याआधीच ही जोडी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

'लागिर झालं जी'मधील अजा आणि माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनाया म्हणजेच नितीश चव्हाण आणि रसिका सुनील यांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. नितीश चव्हाण (Nitish Chavan) आणि रसिका सुनील (Rasika Sunil) एकत्र एका प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत मात्र त्याआधीच ही जोडी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तेदेखील त्यांच्या डान्स व्हिडीओमुळे.

नितीश आणि रसिकाने सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करत याआधीदेखील त्यांनी रिल्स बनवले आहेत आणि प्रेक्षकांना ते आवडलेदेखील. आता पुन्हा एकदा दोघांनी बॉलिवूडच्या  टिप टिप बरसा पानी गाण्यावर रिल बनवला आहे. या गाण्यात दोघांचा रोमँटिक अंदाज दिसत असून गाण्यातील बीट्सवर रसिकाच्या हटके स्टेप्स पाहायला मिळत आहेत. ‘टिप टिप बरसा पानी हुक स्टेप’ असं कॅप्शन टाकत रसिकाने हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओतील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते आहे. 

नितीश उत्तम डान्सर आहे. मालिकेत काम करण्याआधी तो कोरिओग्राफर होता. तर रसिका देखील उत्तम गाणं गाते. नितीश रसिका अनेक गाण्यांच्या खास करुन हुकस्टेप करताना दिसत आहेत. ते दोघे कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 
टॅग्स :नितीश चव्हाणरसिका सुनिल