Join us

मराठी कलाकारांची हवाई सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 23:01 IST

 गेली पाच वर्षे  मिक्ता पुरस्कारची धूम परदेशात चालू आहे. दुबई, लंडन, सिंगापूर, मकाऊनंतर आता थेट मराठी कलाकारांचा मिक्ता पुरस्काराचा ...

 गेली पाच वर्षे  मिक्ता पुरस्कारची धूम परदेशात चालू आहे. दुबई, लंडन, सिंगापूर, मकाऊनंतर आता थेट मराठी कलाकारांचा मिक्ता पुरस्काराचा दौरा आॅस्ट्रेलियाला आहे. हा पुरस्कार सोहळा २७ फ्रेबुवारीला आॅस्ट्रेलियामध्ये सिडनी या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या ड्रिम सिटीमध्ये पोहोचण्यासाठी कलाकारांची लगबगदेखील सुरू झालेली दिसते.कारण प्रार्थना बेहेरे, मानसी नाईक, आदिनाथे कोठारे, उर्मिला कोठारे, आभिजीत खांडेकर, मनवा नाईक या मराठी कलाकारांनी हवाई सफरचे काही फोटो सोशलमिडीयावर टाकले आहे.