Join us  

लग्नानंतर अभिज्ञा भावेने केला मेकओव्हर, दिसतेय पहिल्यापेक्षा अधिकच बोल्ड आणि स्टनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 7:00 AM

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अभिज्ञा भावे गेल्या जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अभिज्ञा भावे गेल्या जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. मेहुल पै याच्यासोबत अभिज्ञाने लग्नगाठ बांधली. अभिज्ञाच्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

अभिज्ञा पतीसोबतचे रोमाँटिक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिज्ञा वेगळ्याच अंदाजात दिसते आहे. शॉर्ट वनपीस अभिज्ञा अधिकच सुंदर दिसतेय. तिच्या चाहत्यांना देखील हा नवा लूक आवडला आहे. 

‘तुला पाहते रे’ मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती. 2014 साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली.

2010 साली ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :अभिज्ञा भावे