Join us  

"तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या फॅन्सना मोठा धक्का, 12वर्षांनंतर अंजली भाभीने सोडली मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 12:46 PM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या 12 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करीत आहेत.

'तारक मेहताचे उल्टा चष्मा' मालिका गेल्या 12 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करीत आहेत. या शोला प्रेक्षकांचे देखील भरभरुन प्रेम दिलं. तारक मेहताच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. शोमध्ये अंजली मेहता म्हणजचे तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारणारी अंजली भाभी शो सोडणार आहे.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, नेहा आता या मालिकेचा भाग नसणार आहे. नेहाने आपला निर्णय निर्मात्यांना सांगितला आहे आणि ती सेटवरसुद्धा येत नाही. निर्मात्यांनी नेहाला शोमध्ये परत आणण्याचे खूप प्रयत्न केले पण नेहा आपल्या निर्णयावर ठाम राहिली. नेहाकडे करिअरमध्ये काही तरी वेगळं करण्याचा प्लान आहे आणि याच कारणामुळे ती ही मालिका सोडत असल्याचे कळतंय.लॉकडाऊननंतर नेहा सेटवर परतलीच नाही. मात्र या वृत्तावर शोच्या मेकर्स आणि नेहाची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार तारक मेहताची पत्नी अंजली भाभीची भूमिका करणारी नेहा या मालिकेसाठी एक दिवसाचे जवळपास पंचवीस हजार मानधन घेते. त्यासोबतच ती पंधरा दिवस शूटिंग करते. नेहा ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या गाडींची मालकीण आहे. फार कमी लोकांना माहित आहे की नेहा मेहता खूप चांगली डान्सर आहे आणि भरतनाट्यममध्ये माहिर आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा