Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' अभिनेत्याला छोट्या पडद्याने खूप काही शिकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 16:49 IST

अमानवी शक्तींवर आधारित आपल्या ‘दिव्य दृष्टी’ या आगामी मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ‘स्टार प्लस’ वाहिनी सज्ज झाली आहे.

अमानवी शक्तींवर आधारित आपल्या ‘दिव्य दृष्टी’ या आगामी मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ‘स्टार प्लस’ वाहिनी सज्ज झाली आहे. ह्या शोमध्ये अध्विक महाजन ह्या मालिकेत रक्षित शेरगिल ह्या नायकाची भूमिका साकारणार आहे.

अध्विक महाजनने आपल्या अनेक टीव्ही मालिका आणि बॉलीवूड तसेच टॉलीवूडमधील चित्रपटांमधील कामासह प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. रक्षितची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अध्विक अतिशय उत्साहात असून रक्षित हा एक धनाढ्‌य व्यावसायिक आहे आणि तो ह्या बहिणींच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका साकारेल. अध्विक म्हणाला, “ही भूमिका साकारण्यासाठी मी उत्साहात आहे. मला दीड वर्षांपासून ही भूमिका साकारायची होती आणि हे जणू माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. टेलिव्हिजनने मला खूप काही शिकवले असून मी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये फरक करत नाही. माझ्यासाठी काम हे काम आहे. माझा कठोर मेहनतीवर विश्वास असून माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमधून मी नवीन काहीतरी शिकत असतो.” रक्षितच्या रूपात दिव्य दृष्टीमध्ये अध्विकला पाहणे खरंच रोचक ठरेल!

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेद्वारे आपल्या अभिनयाची जादू टीव्हीवर पसरणार आहे. या मालिकेत ती पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एका पिशाचिनीच्या आईची भूमिका साकारणार आहे.  

टॅग्स :स्टार प्लस