Join us

झेबीसिंगबरोबर डेटवर जायचेय 'या' अभिनेत्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:30 IST

आपल्या  आकर्षक व्यक्तिमत्त्वाने लक्षावधी प्रेक्षकांची हृदये काबीज केलेल्या झेबीसिंगचे व्यक्तिमत्त्व आता केवळ त्याच्या प्रेक्षकांपुरते मर्यादित राहिले नसून ते त्यांच्या पलीकडील लोकांनाही भावताना दिसतेय.

आपल्या  आकर्षक व्यक्तिमत्त्वाने लक्षावधी प्रेक्षकांची हृदये काबीज केलेल्या झेबीसिंगचे व्यक्तिमत्त्व आता केवळ त्याच्या प्रेक्षकांपुरते मर्यादित राहिले नसून ते त्यांच्या पलीकडील लोकांनाही भावते  आहे, असे दिसते.  ‘स्टार भारत’वरील ‘पापा बाय चान्स’ या नव्या मालिकेत युवानची भूमिका रंगविणाऱ्या झेबीसिंगकडे याच वाहिनीवरील ‘निम्की मुखिया’ मालिकेत निम्कीची भूमिका रंगविणारी अभिनेत्री भूमिका गुरुंगही आकर्षित झाली आहे, असे दिसते. तिने म्हटले आहे की देवाने तिची एक इच्छा पूर्ण करम्याचे ठरविले, तर तिला झेबीसिंगबरोबर तिच्या आवडत्या रेस्तराँमध्ये जेवायला जायला आवडेल.

आपली ही इच्छा व्यक्त करताना भूमिका गुरुंग म्हणाली, “पापा बाय चान्स ही मालिका प्रसारित होऊ लागली, तेव्हापासून मी तिचा प्रत्येक भाग बघितला आहे. त्यातील युवानची व्यक्तिरेखा मला अतिशय आवडली असून ती साकार करणाऱ्या झेबीसिंगच्या व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेले आहे. त्याचं एक वेगळंच आकर्षण वाटतं आणि पडद्यावर तो ज्या सहजतेने वावरतो, ते पाहणं खूपच आनंददायक आहे. संधी मिळाली, तर मला युवानसारख्या व्यक्तीबरोबर डेटवर जायला नक्कीच आवडेल!”

पापा बाय चान्समधील बिनधास्त दिल्ली बॉय युवानची ओळख करून देताना रफ्तार रॅपिंग करेल. वाहिनीने एखाद्या व्यक्तिरेखेची ओळख अशा पद्धतीने फारच कमी वेळा केली असेल. वाहिनीने शोधून काढलेला झेबी सिंग हा युवानच्या व्यक्तिरेखेसाठी अगदी अनुरूप असून युवानला वर्तमानात जगायला आवडते आणि नातेसंबंधांमध्ये फार न गुरफटणे हा त्याचा मंत्र आहे। देखणा मॉडेल झेबी पापा बाय चान्समधून अभिनयामध्ये पदार्पण करत आहे.