'लपंडाव' (Lapandav Serial) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रेया कुळकर्णी (Shreya Kulkarni) हिने तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल अपडेट दिली होती. हा प्रोजेक्ट म्हणजे मालिका 'लपंडाव'. यात ती उर्मिला नामक ग्रे शेड भूमिकेत दिसणार आहे. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट आला असून सखीचं स्वयंवर पाहायला मिळणार आहे आणि उर्मिला कटकारस्थान करताना दिसणार आहे.
'लपंडाव' मालिकेत आता सखीच्या स्वयंवराचा मोठा सोहळा पाहायला मिळणार आहे. श्रेयाने एका मुलाखतीत सांगितले की, तिने सखीच्या स्वयंवरात तिच्या माहेरच्या एका मुलाला ठरवून सहभागी केले आहे. हा स्वयंवर सोहळा अत्यंत भव्य आणि मनोरंजनपर असणार आहे. विशेष म्हणजे, आजकालच्या जेन झी पिढीला आकर्षित करेल अशा पद्धतीने या स्वयंवराचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मालिकेतील उर्मिला ही सखीची काकू आहे. तिने तिच्या पात्राविषयी माहिती देताना सांगितले की, तिला 'कामत एम्पायर'ची भावी 'सरकार' तिला बनायचे आहे आणि त्यासाठीच तिने हा स्वयंवराचा डाव रचला आहे. उर्मिला आता कसा आपला डाव साधून माहेरच्या मुलाला विजयी करते, हे स्वयंवराच्या प्रसंगात प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. 'लपंडाव' मालिकेची संपूर्ण टीम या सखीच्या स्वयंवरासाठी खूप उत्सुक आहे.
वर्कफ्रंटश्रेया कुळकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केले आहे. तिने स्वामी समर्थ, गाथा नवनाथांची, बाळूमामांच्या नावाने चांगभलं, शुभ विवाह या मालिकेत काम केले आहे.
Web Summary : The 'Lapandav' series features Sakhi's Swayamvar, where Urmila plots to make her relative win. Shreya Kulkarni reveals Urmila's desire to control the Kamat Empire drives her actions. The show promises a grand, modern Swayamvar, exciting the entire team.
Web Summary : 'लपंडाव' श्रृंखला में सखी का स्वयंवर है, जहाँ उर्मिला अपने रिश्तेदार को जिताने की साजिश रचती है। श्रेया कुलकर्णी ने खुलासा किया कि कामत साम्राज्य को नियंत्रित करने की उर्मिला की इच्छा उसे ऐसा करने के लिए प्रेरित करती है। शो एक भव्य, आधुनिक स्वयंवर का वादा करता है, जिससे पूरी टीम उत्साहित है।