Join us

अभिनेत्री शिवानी रांगोळेची पार पडली रिंग सेरेमनी, ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिच्या होणाऱ्या सासूबाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 15:00 IST

शिवानी रांगोळे (Shivani Rangole)ने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळी शेवटची स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सांग तू आहेस ना' या मालिकेत पाहायला मिळाली. ही मालिका संपून बराच काळ उलटला आहे. तरीदेखील या मालिकेतील शिवानीच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली होती. शिवानीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान आता शिवानीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

अभिनेत्री शिवानी रांगोळी हिने इंस्टाग्रामवर रिंगसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, २०२२मध्ये रिंग घातली. शिवानी रांगोळीचा हा लकी चार्म कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर तिच्या या लकी चार्मचे नाव आहे विराजस कुलकर्णी.

विराजसदेखील अभिनेता आहे. माझा होशील ना या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. विराजस फक्त अभिनेता नसून तो दिग्दर्शकदेखील आहे. विशेष बाब म्हणजे विराजस प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. तर शिवानीने बऱ्याच मराठी मालिका आणि सिनेमात काम केले आहे. शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. दरम्यान ते न्यू इअर सेलिब्रेशनसाठी गोव्यात गेले होते. तिथले फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत. 

टॅग्स :शिवानी रांगोळेमृणाल कुलकर्णी