अभिनेता अक्षय केळकर हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. अक्षयचा चाहतावर्गही फार मोठा आहे. अक्षय हा मालिका आणि पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. खूप कमी वयात अक्षय केळकरने मोठे यश मिळवलं आहे. आपल्या मेहतनीच्या जोरावर त्याने पैसा आणि प्रसिद्धी कमावली आहे. मुंबईसारख्या शहरात त्याने स्व:ताचं घर घेतलं आहे. आता एका मराठी अभिनेत्रीने अक्षयचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.
अक्षय केळकरच्या घराचे फोटो अभिनेत्री शर्मिला शिंदेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती नुकतीच अभिनेत्याच्या घरी गेली होती. त्याच्या घरातील खास फोटो तिने शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने लिहलं, "तुझ्या घरातून हे शहर दिसते आणि या शहरात घर मिळवण्यासाठी तू खूप मेहनत केलीस मित्रा. मला तुझा खूप अभिमान आहे". या पोस्टवर चाहत्यांनीही विविध कमेंट करत अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.
अक्षयने आपलं घर अतिशय साध्या आणि सुंदररित्या सजवलं आहे. याची झलक अभिनेत्याने यापूर्वी देखील शेअर केली होती. अक्षय केळकरच्या घराच्या भिंतीवर विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळते. अक्षय आणि शर्मिलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'अबीर गुलाल' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तर शर्मिला ही सध्या 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत दुर्गा या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.