Join us

अभिनेत्री रश्मी देसाईने कोरियोग्राफ केला स्वतःचा अॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 15:34 IST

रश्मी देसाई स्टारप्लस दांडिया नाईट्‌समध्ये ती स्वतःचा अॅक्ट स्वतः कोरियोग्राफ करणार आहे.

कलाकार हे अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी टीव्ही अभिनेत्री म्हणजे उतरन फेम  रश्मी देसाई. उतरन याच मालिकेतून रश्मी घराघरात पोहचली. याच मालिकेतून तिला एक नवीन ओळख मिळाली. तपस्या या भूमिकेमुळे ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. आजही रश्मीला तिचे चाहते तपस्या म्हणून जास्त ओळखतात. 

स्टारप्लसवर पुन्हा एकदा खास आणि सर्वांत मोठा सेलिब्रेटरी इव्हेंट शो  दांडिया नाईट्‌स येणार असून हा शो नवरात्रीचा सण आणि दसरा साजरा करतो. यात लोकप्रिय फिल्म आणि टीव्ही सेलेब्रिटी गरबा आणि दांडिया यांचे फ्यूजन परफॉर्म करताना दिसतील. ह्या सोहळ्‌यात अभिनेत्री रश्मी देसाईच्या परफॉर्मन्समुळे प्रेक्षक थक्कच झाले.

रश्मीने स्टारप्लसवरील लोकप्रिय शो परी हूँ में, श्श्श्श… फिर कोई है, कॉमेडी का महा मुकाबला आणि डान्स रिअॅलिटी शो नच बलियेमध्ये झळकली होती. होती. आता स्टारप्लस दांडिया नाईट्‌समध्ये ती स्वतःचा अॅक्ट स्वतः कोरियोग्राफ करणार आहे. ती उत्साहाने म्हणाली, “मी स्टारप्लसची आभारी आहे की त्यांनी मला एवढ्‌या खास आणि नवरात्री आणि दसरा सेलिब्रेशन  दांडिया नाईट्‌सचा भाग बनण्याची संधी दिली. हे म्हणजे माझ्या परिवाराकडे परत येण्यासारखे असून मी खूप आनंदात आहे. मी ‘डोला रे’ वर परफॉर्म करणार आहे हे कळताच माझ्यातील डान्सरने अगदी आनंदाने उडीच मारली.

हा अॅक्ट मी स्वतःच कोरियोग्राफ करण्याचे ठरवले. स्टारप्लसने मला डान्सर म्हणून माझा पहिला ब्रेक दिला होता आणि आता माझे कोरियोग्राफी कौशल्य दाखवण्यासाठीही त्यांनी संधी दिली आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझा परफॉर्मन्स आवडेल.” रश्मीने दररोज आपल्या शूट टाईममधून ३ तास आपल्या अॅक्टसाठी दिले आणि आपल्या परफॉर्मन्सबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ती अतिशय उत्साहात आहे. 

टॅग्स :रश्मी देसाईस्टार प्लस