Join us  

ऊफ़..हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावतने केले असे काही की, लाजला चक्क सलमान खान!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 5:57 PM

तिने बॉलिवूडचा दबंग खान सलमानला तिच्या अदांची मोहिनी घातलीय. होय, बिग बॉस १३ च्या सेटवर तिने असे काही केले की, तिच्या कृतीने सलमानही लाजला.

बॉलिवूडची हॉट बाला मल्लिका शेरावत हिच्या हॉटनेसबद्दल काय सांगायचं? बॉलिवूडच्या भल्या भल्या अ‍ॅक्टर्सना तिने तिच्या हॉट अदांनी घायाळ केलेलेच आहे. पण आता तुम्हाला माहितीये का, तिने बॉलिवूडचा दबंग खान सलमानला तिच्या अदांची मोहिनी घातलीय. होय, बिग बॉस १३ च्या सेटवर तिने असे काही केले की, तिच्या कृतीने सलमानही लाजला. तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आलाय. तुम्हाला बघायचाय?

बिग बॉस’ हिंदीच्या १३व्या पर्वात सध्या हाईवोल्टेज ड्रामा सुरु आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मि देसाई या दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणे सुरु आहेत. दरम्यान बिग बॉसमध्ये तापलेले वातावर थोडेसे थंड करण्यासाठी अभिनेत्री मल्लिका शेरावतला विशेष पाहुणी म्हणून बोलवण्यात आले. मात्र शोमध्ये आल्यावर तिने असे काही केले जी ज्यामुळे सलमानही लाजला.

तिने सलमानला मी किती हॉट आहे? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताना तिने अत्यंत मादक हावभाव केले. त्यावेळी तिने सलमानचा हात देखील पकडला होता. या सर्व प्रकारामुळे सलमान थोडासा गोंधळला. त्यानंतर त्याने थोडेसे लाजत तिचा हात दूर केला. लाजणाऱ्या सलमानला पाहून प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला. हा व्हिडीओ सोनी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :सलमान खानमल्लिका शेरावतकलर्सबिग बॉस