Join us  

अभिनेत्री लीना आचार्यचे निधन, आईने किडनी दिली पण...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 10:29 AM

गेल्या दीड वर्षांपासून लीना किडनीच्या आजाराने ग्रस्त होती.

ठळक मुद्देराणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या बॉलिवूड सिनेमामध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री लीना आचार्यचे   शनिवारी (21 नोव्हेंबर) किडनी फेल झाल्यामुळे निधन झाले आहे. गेल्या दीड वर्षांपासून लीना किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. काल तिची मृत्यूशी झुंज संपली. नवी दिल्लीमध्ये अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.  प्रारंभी लीनाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र आता तिच्या मृत्यूचे कारण किडनी फेल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लीनाला तिच्या आईने किडनी दान केली होती.  मात्र तरीही लीनाचा जीव वाचू शकला नाही. तिच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वातील तिच्या सहकारांनीही तिच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे.‘सेठ जी’ या मालिकेत लीनासोबत काम करणारा अभिनेता वरशिप खन्ना शिवाय अभिनेता रोहन मेहत यांनी तिच्या निधनावर शोक व्यक्त केला. अभिषेक भालेराव यानेही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 

रोहनने लीनाचा फोटो शेअर करत लिहिले, ‘ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो मॅम, गेल्यावर्षी याच काळात आपण ‘क्लास आॅप’ या मालिकेचे शूटींग करत होतो.’ अभिषेक भालेरावने लीनासोबतच्या झालेल्या अखेरच्या चॅटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. मी यावर्षी काहीच करणार नाही, फक्त आराम करेन. पुढच्या वर्षी मुंबईला जाईन, असे लीनाने या स्क्रिनशॉटमध्ये लिहिले आहे.लीनाने सेठ जी, आप के आ जाने से, मेरी हानिकारक बीवी, क्लास आॅफ 2020 यासह अनेक मालिकांमध्ये काम केले होते. राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या बॉलिवूड सिनेमामध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.

अखेरची पोस्ट

मृत्यूच्या काही दिवस आधी लीनाने सोशल मीडियावर मृत्यू संदर्भातच पोस्ट केली होती. ‘ मृत्यू फक्त श्वास घेऊन जाईल, यापेक्षा अधिक काय गमवावे लागेल,’ असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते.  

टॅग्स :टेलिव्हिजन