‘बहू हमारी रजनी-कान्त’मालिकेतील या अभिनेत्रीचे एकेकाळी गायिका बनण्याचे होते स्वप्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 17:07 IST
ब-याच कलाकरांना आपण उत्तम गातानाही बघतो. याच यादीत आता रिध्दीमा पंडीतचा समावेश करणे वावगे ठरणार नाही. होय, काही दिवसांपूर्वीच ...
‘बहू हमारी रजनी-कान्त’मालिकेतील या अभिनेत्रीचे एकेकाळी गायिका बनण्याचे होते स्वप्न?
ब-याच कलाकरांना आपण उत्तम गातानाही बघतो. याच यादीत आता रिध्दीमा पंडीतचा समावेश करणे वावगे ठरणार नाही. होय, काही दिवसांपूर्वीच रिध्दीमाने ती चांगली मिमिक्रीही करते असे सांगितले होते. मिमिक्रीमुळेच तिला बहू हमारी रनजीकांत मालिकेत मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली होती. आता तर ती उत्तम गात असल्याचेही सागंते. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी गायिकाच बनण्याची ईच्छा होती. आपल्या अभिनयाची मोहिनी घातलेल्या रिध्दिमा पंडित या अभिनेत्रीविषयी ही गोष्ट फारशी कोणाला माहित नाही.मालिकेच्या सेटवरील सूत्राने सांगितले की रिध्दिमाचा आवाज अतिशय गोड असून ती अनेकदा सेटवर गाणी गाताना दिसते. कधी कधी तर मालिकेतील सारे कलाकार आणि काही कर्मचारीही ब्रेकमध्ये तिच्याभोवती गोळा होतात.आणि तिला गाणे गाण्याची फरमाईश करताच एक सुरेल मैफलही सेटवर भरते. तिच्या गाण्याचा सारेच मनापासून आनंद घेतात. ती गाऊ लागली की सेटवर सुरेल वातावरणनिर्मिती होते, असे या सूत्राने सांगितले.यासंदर्भात रिध्दिमाला विचारले असता ती म्हणाली,“मला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. मी काही गाण्याचं शास्त्रीय शिक्षण घेतलेलं नाही; मात्र मला शाळेत गाण्याच्या स्पर्धेत नेहमीच बक्षीस मिळत असे.मी जर अभिनयाच्या क्षेत्राकडे वळले नसते, तर नक्कीच गाण्याच्या रिअॅलिटी शोंमधून स्पर्धा देत राहिले असते. आजही सणवारी आमच्या घरी मीच गाते आणि माझं गाणं हा माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम असतो.” रिध्दीमा ‘बहू हमारी रजनी-कान्त’ या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेत रजनी या यंत्रमानवी सुनेची भूमिका साकारतेय.