हा अभिनेता झळकणार जिंदगी की महेकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:40 IST
जिंदगी की महेक या मालिकेच्या कथानकाला नुकतीच एक कलाटणी मिळाली आहे. महकसोबत अजयने लग्न करण्यामागे त्याचा उद्देश काय होता ...
हा अभिनेता झळकणार जिंदगी की महेकमध्ये
जिंदगी की महेक या मालिकेच्या कथानकाला नुकतीच एक कलाटणी मिळाली आहे. महकसोबत अजयने लग्न करण्यामागे त्याचा उद्देश काय होता हे नुकतेच शौर्यने सगळ्यांसमोर आणले. त्याचा वाईट हेतू महेकच्या कुटुंबीयांच्यासमोर आणल्यामुळे महक आणि शौर्य आता लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या कथानकाला मिळत असलेल्या कलाटणीसोबतच आता एका नवीन पात्राची मालिकेत एंट्री होणार आहे. जिंदगी की महेक या मालिकेत आता प्रेक्षकांना आशू कोहली पाहायला मिळणार आहे. आशू गेल्या अनेक वर्षं इंडस्ट्रीत असून त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जाहिरात उद्योगातील एक मोठे नाव म्हणून आशूकडे पाहिले जाते. आतापर्यंत हजारहून अधिक प्रिंट जाहिरातींमध्ये तो झळकला आहे. आता आशू या मालिकेत एका मोठ्या उद्योजकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आशूने नुकतेच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या मालिकेविषयी आशू सांगतो, या मालिकेचे चित्रीकरण करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला आहे. सौरभ तिवारी यांच्यासोबत काम करायला तर मला खूप आवडत आहे. या संपूर्ण टीमसोबत काम करताना मजा येत आहे. या मालिकेतील इतर व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचे जितके प्रेम प्रेक्षकांनी दिले आहे. तितकेच प्रेम माझ्या फॅन्सने मलादेखील द्यावे अशी माझी इच्छा आहे. या मालिकेत मी धीर शौरी ही व्यक्तिरेखा साकारणार असून माझे देशातील अनेक भागांत रेस्टॉरन्ट असल्याचे दाखवण्यात येणार आहे. मला शौर्य अजिबातच आवडत नसल्याने प्रत्येकवेळी त्याला शह देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.