लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात अभिनेत्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 09:00 IST
तमिळ टेलिव्हिजनचा प्रसिद्ध अभिनेता साई प्रशांतने रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिस सूत्रानुसार, प्रशांतने प्यायलेल्या पेय पदार्थामध्ये विष होते, ...
लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात अभिनेत्याची आत्महत्या
तमिळ टेलिव्हिजनचा प्रसिद्ध अभिनेता साई प्रशांतने रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिस सूत्रानुसार, प्रशांतने प्यायलेल्या पेय पदार्थामध्ये विष होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. प्रशांतच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु एकाकीपणा असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. छोट्या पडद्यावर दिसणारा प्रशांत आपल्या खाजगी आयुष्यात अस्थिर होता. त्याचे पहिले लग्न संपुष्टात येऊन तीन महिन्यापूर्वीच दुसरा विवाह केला होता. अन्नामलाई, सेल्वी, अरासी यासारख्या डेली सोपमध्ये प्रशांतने काम केले होते. तसेच नेरम, तेगीडी आणि वाडाकरी यांसारख्या काही तमिळ चित्रपटांतही तो दिसला होता.