Join us  

मालदीवमध्ये राम कपूर करतोय गौतमीसोबत रोमान्स, आठवले हनीमूनचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 5:04 PM

'बडे अच्छे लगते हैं' अभिनेता राम कपूर (Ram Kapoor And Gautami beachy vacation ) पत्नी गौतमीसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय.

'बडे अच्छे लगते हैं' अभिनेता राम कपूर (Ram Kapoor And Gautami beachy vacation ) पत्नी गौतमीसोबत त्याच ठिकाणी  गेलेत, जिथे ते त्यांच्या हनिमूनला गेले होते. मुंबईच्या समुद्रापासून दूर, दोघेही सध्या मालदीव  ( Ram Kapoor Maldives holidays)च्या समुद्रात एन्जॉय करत आहेत. राम कपूर आणि गौतमीने या सुंदर व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

मालदीवची हे पोटो शेअर करत राम कपूरने त्याचे वर्णन नंदनवन असे केले आहे. त्याने आपल्या पत्नीसोबतचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो मालदीवच्या बीचवर गौतमी कपूरला KISS करताना दिसतो आहे. याशिवाय, तो जिथे राहतोय त्या रिसॉर्टच्या  झलकही त्याने फोटोच्या माध्यमातून दाखवली आहे.

गौतमी कपूरनेही मालदीवमधील बोट राईडचा एक मजेदार व्हिडिओही शेअर केला आहे. याशिवाय गौतमीने रिसॉर्टमधील तिच्या खोलीची झलकही दाखवली आहे. गौतमी तिच्या खोलीत कॉफीचा आनंद घेते आहे आणि मुले बाहेर स्विमिंग पूलचा आनंद घेताना दिसत आहेत.

अलीकडेच गौतमीने मालदीवच्या व्हॅकेशनचा एक जुना फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. हा फोटो 2003 मधला आहे, जेव्हा राम कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती आणि ते दोघे पहिल्यांदा एकत्र मालदीवला गेले होते. या फोटोत दोघेही खूपच तरुण आणि एकदम फिट दिसत आहेत.

'घर एक मंदिर' या मालिकेत दोघेही एकत्र दिसले होते ही मालिका 2002 मध्ये टेलिव्हिजनवर दिसली होती, त्यानंतर एका वर्षानंतर दोघांनी लग्न केले.

टॅग्स :राम कपूरटिव्ही कलाकार