Join us

अभिनेत्री पारुल चौहान आणि चिराग ठक्कर यांचा बेफिक्रे स्टाइल हनीमून,SEE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 08:00 IST

12 डिसेंबर रोजी पारुल चौहानने टीव्ही अभिनेता चिराग ठक्करसोबत कोर्ट मॅरेज केले होते. चिरागसोबत पारुलची पहिली भेट 2015 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. लग्नापूर्वी तीन वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं टीव्ही कपल पारूल चौहान आणि  अभिनेता चिराग ठक्कर अखेर लग्नबंधनात अडकलं. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत झळकत असलेली टीव्ही अभिनेत्री पारुल चौहान पतीसोबत सध्या हनीमून एन्जॉय करत आहे. पारुल पती चिराग ठक्करसोबत मालदिवमध्ये हनीमूनसाठी गेली आहे. लग्नाच्या फोटोनंतर आता या दोघांचे हनीमून एन्जॉय करत असल्याचे फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघेही बेफिक्रे स्टाइलने हनीमून एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये पारुल आणि चिरागर कधी बीचवर तर कधी शिपवर रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. इतकेच नाही तर दोघांनी स्काय डायव्हिंगचाही येथे आनंद लुटला. 12 डिसेंबर रोजी पारुलने टीव्ही अभिनेता चिराग ठक्करसोबत कोर्ट मॅरेज केले होते. चिरागसोबत पारुलची पहिली भेट 2015 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. लग्नापूर्वी तीन वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

पारुल चौहानने आतापर्यंत अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. 2007 मध्ये तिची पहिली मालिका 'बिदाई' आली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला रसिकांची अधिक पसंती मिळाली होती. पहिल्याच मालिकेतून पारूलने सा-यांची पसंती मिळवली होती. त्यानंतर ती 'झलक दिखला जा-3','रिश्तों से बडी प्रथा' , 'अमृत मंथन' , 'पुनर्विवाह' 'मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकांमध्ये झळकली. सध्या ती स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत झळकत आहे.

टॅग्स :पारुल चौहान