Join us  

'गुड्डन… तुमसे ना हो पाएगा' मालिकेत 'या' अभिनेत्याची होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 6:00 AM

गुड्डन आणि तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेल्या अक्षत यांचा अनपेक्षितपणे विवाह झाल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत. या विवाहामुळे गुड्डन ही देशातील (पडद्यावरील) सर्वात तरूण सासू बनल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेतील गुड्डन (कनिका मान) आणि अक्षत (निशांतसिंह मलकाणी) यांच्यातील नात्याने प्रेक्षक चांगलेच प्रभावित झाले आहेत. गुड्डन आणि तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेल्या अक्षत यांचा अनपेक्षितपणे विवाह झाल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत. या विवाहामुळे गुड्डन ही देशातील (पडद्यावरील) सर्वात तरूण सासू बनल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. कथानक जसे पुढे सरकेल, तसे प्रेक्षकांना अक्षतचा बालपणीचा मित्र श्री. दत्ता याच्या प्रवेशाने कथानकाला आणखी एक वळण मिळणार आहे. दत्ताची भूमिका देखणा आणि अतिशय गुणी कलाकार दिवय धामिजा हा रंगविणार आहे. दिवयने आतापर्यंत सकारात्मक भूमिकाच रंगविल्या असून आता प्रथमच तो एका खलनायकी भूमिकेत प्रेक्षकांना दिसेल.

श्री. दत्ताची व्यक्तिरेखा अक्षतला अडचणीत आणून त्याचा सर्वनाश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. दिवाळीच्या पार्टीत दत्ता अचानक जिंदाल हाऊसमध्ये येऊन अक्षतला आश्चर्याचा धक्का देतो. त्याला पाहून अक्षतला मनस्वी आनंद झाला असला, तरी दत्ताच्या मनातील कपट आणि त्याचा अंत:स्थ हेतू याबद्दल अक्षत पूर्णपणे अनभिज्ञ असतो. दिवाळीनिमित्त खेळल्या जाणार्‍्या जुगारात अक्षत आपली सारी दौलत पणाला लावतो. ती हरल्यास तो कफल्लक बनला असता. त्यावेळी गुड्डनही त्यांच्या खेळात सहभागी होते. पण ते पाहून नाराज झालेला अक्षत खेळ सोडून निघून जातो.

आपली व्यक्तिरेखा संदर्भात दिवय म्हणाला, “यंदा मला ‘गुड्डन…’सारख्या मालिकेत एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारावयास मिळाल्याने यंदाच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे, असं म्हणावं लागेल. मी टीव्ही मालिकेत प्रथमच खलनायकाची भूमिका रंगवीत असून या मालिकेतील भूमिकेपेक्षा दुसरी चांगली नकारात्मक भूमिका मला मिळाली नसती. श्री. दत्ता यांच्या व्यक्तिरेखेत बरेच पैलू असून माझ्यातील अभिनेत्यासाठी ही भूमिका रंगविणं हे एक आव्हान आहे. प्रेक्षकांना भरपूर नाट्यमय कथानक पाहण्यास मिळणार आहे.”

टॅग्स :गुड्डन तुमसे ना हो पायेगा