Join us  

भाऊ कदमच्या थोरल्या लेकीने स्वत:चा खर्च भागवण्यासाठी 18 व्या सुरु केला होता स्वतःचा व्यवसाय, म्हणाली-वडिलांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 6:00 AM

सोशल मीडियावर सक्रीय असलेली मृण्मयी वडिलांप्रमाणे कलाविश्वात पदार्पण करणार का? असा प्रश्नही तिला अनेकदा विचारण्यात येतो.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या शोमधील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या शोमधून विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) घराघरात पोहचला आहे. भाऊ कदमने आपल्या कौशल्याच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केले आहे. भाऊ कदमची लेक मृण्मयी कदम(Mrunmayee Kadam)ने अद्याप सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकलं नसलं तरी ती सतत चर्चेत येत असते. आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. भाऊची लेक मृण्मयी कदमही स्वतःचा व्यवसाय करत आहे.

मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केले. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनल आहे आणि त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहेत. २०२०मध्ये तिने ‘तारुंध्या’ हा ब्रँड सुरू केला. मृण्मयीचा ‘ट्रेंडी हेअर बो’ (Scrunchies)चा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मृण्मयीने तिच्या या व्यवसायाबाबतच एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

मृण्मयीने हा व्यवसाय वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:चा खर्च भागवण्यासाठी सुरु केला आहे. संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं.

मृण्मयीला सुरुवातीच्या काळात व्यवसायामध्ये नुकसानही सहन करावं लागलं. पण भाऊ व त्यांची पत्नी मृण्मयीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. मृण्मयी म्हणते, “वडिलांनी माझ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल ममता कदम धन्यवाद. जेव्हा कधी मी ‘शार्क टँक’ कार्यक्रमामध्ये जाईन तेव्हा आपण दोघी एकत्र जाऊ.” भाऊची थोरली लेक मृण्मयी घरात प्रत्येकाचीच लाडकी असल्याचं पाहायला मिळतं.

 

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या