Join us  

अभिजीत पोहनकर सरगममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 11:17 AM

सरगम हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात नेहमीच आपल्याला संगीतातील दिग्गजांना पाहायला मिळते. आता आपल्याला ...

सरगम हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात नेहमीच आपल्याला संगीतातील दिग्गजांना पाहायला मिळते. आता आपल्याला अभिजीत पोहनकर यांच्या संगीतावर आधारित दोन भाग पाहायला मिळणार आहेत. अभिजीत पोहनकर हे संगीत क्षेत्राच्या नवीन युगातील एक महत्त्वाचे नाव आहे. संगीत निर्माता, संयोजक, गायक, पियानो वादक अशा अनेक गोष्टींमुळे अभिजीत पोहनकर यांनी त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिजीत पोहणकरांच्या रक्तातच संगीत ठासून भरलेले आहे. कारण ते ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजय पोहनकर यांचे सुपुत्र असून त्यांनी जगप्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडून संगीत वाद्द्यांचे धडे घेतले आहे आणि मुख्य म्हणजे अभिजीत संपूर्ण भारतात एकमेव संगीतकार आहेत जे भारतीय शास्त्रीय संगीत की-बोर्डवर वाजवतात. अशा अप्रतिम संगीतकाराचे संगीत रसिकांना ऐकायला मिळणार आहे.सरगम या कार्यक्रमात अभिजीत पोहनकर यांच्या दोन भागात घेई छंद, खेळ मांडला, मी राधिका, उघड्या पुन्हा, माझे जीवन गाणे, मी रात टाकली, इंद्रायणी काठी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, अलबेला सजन ही आणि अशी अनेक गाणी ऐकायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अभिजीत पोहणकरांचा एक पियानो स्पेशल परफॉर्मन्ससुद्धा पाहायला मिळणार आहे. अभिजीत पोहनकर यांच्या भागात पंडित कल्याणजी गायकवाड, शौनक अभिषेकी, कृष्णा बोंगाणे, सारा, सायली तळवलकर, अनुजा झोकारकर, पूजा गायतोंडे आणि श्रीनिधी घटाटे यांनी गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे अजय पोहनकर यांचेही एक अप्रतिम गाणे रसिकांना ऐकायला मिळणार आहे. उर्मिला कानेटकर-कोठारे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.