Join us

अन् थोडक्यात बचावला अभिजीत खांडकेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 19:41 IST

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे.

ठळक मुद्देअभिजीत शूटिंगसाठी जात असताना मिरा-भाईंदर पुलावर झाला अपघात

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. २५ नोव्हेंबरला चित्रीकरणासाठी जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात अभिजीतला कोणतीही दुखापत झाली नाही. 

अभिजीत शूटिंगसाठी जात असताना मिरा-भाईंदर पुलावर हा अपघात झाला. त्याच्या कारसमोरील ट्रक धातूचे मोठमोठे पाईप घेऊन जात होता. त्यातील एक पाईप त्याच्या कारच्या दिशेने घरंगळत आला आणि त्याच्या कारची समोरील काच पूर्णपणे तुटली व तो पाईप पुलाखाली पडला. सुदैवाने अभिजीतला कोणतीही दुखापत झाली नाही. पण, त्याच्या कारचे नुकसान झाले आहे. अभिजीतने त्याच्या कारचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

सध्या अभिजीत 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत गुरूनाथ सुभेदारची भूमिका साकारतो आहे आणि या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. छोट्या पडद्यासह अभिजीतने मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात.  

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको