Join us  

Bigg Boss Marathi 2 : 'या' कारणामुळे अभिजीत केळकर गेला घराबाहेर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 9:40 AM

आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे.... घरातील तीन स्ट्रॉंग सदस्य आणि एक नवा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले होते.

बिग बॉस मराठी सिझन 2 चा या आठवड्यातील विकेंडचा डाव विशेष होता आणि सदस्यांना सरप्राईझ देखील मिळाले.  कारण मंचावर एंट्री झाली बॉलीवूडचा भाईजान आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सलमान खान याची... यामुळे मंचावर एक वेगळीच जान आली... महेश मांजरेकर यांनी सलमान खानचे स्वागत केले आणि मंचावर गप्पा रंगल्या…महेश मांजरेकर यांनी सलमानला पहिला चित्रपट कसा मिळाला हे विचारले आणि मग सलमाने त्या मागचा किस्सा सांगितला. महेश मांजरेकर यांनी सलमान खानसोबत मैत्री कशी झाली तो किस्सा सांगितला आणि या क्षेत्रात माझा एकच मित्र आहे आणि तो म्हणजे सलमान खान असे सांगितले. तर सदस्यांशी देखील बर्‍याच गप्पा मारल्या, त्यांना सल्ला दिला आणि बरीच मजा मस्ती केली…पण अखेर तो क्षण आला जेव्हा या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोणा एका सदस्याला घर सोडून जावे लागणार होते... आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे.... घरातील तीन स्ट्रॉंग सदस्य आणि एक नवा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले. अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे डेंजर झोनमध्ये आले होते आणि अभिजीत केळकरला या आठवड्यामध्ये घर सोडून जावे लागले... कारण त्याला कमी मतं मिळाली. शिवला अश्रु अनावर झाले त्याला विश्वास ठेवणे अशक्य होते. घरातील प्रत्येक सदस्याला वाईट वाटले. पण नियमानुसार हे अनिवार्य असते. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडताना त्याने शिवला सल्ला दिला आणि अभिजीतने खास शिवसाठी गाणे म्हटले... महेश मांजरेकर म्हणाले “मी तुला टॉप 5 मध्ये पहिले होते, पण घरामध्ये मतं मांडणारा आणि त्या मतावर ठाम राहणारा सदस्य बाहेर गेला” असे मी म्हणेन.  अभिजीत केळकरने तुझे माझे जमेना, मधु इथे आणि चंद्र तिथे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तर काकस्पर्श, बालगंधर्व या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्याला या चित्रपट, मालिकांपेक्षा बिग बॉसमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अभिजीतचे लग्न झालेले असून त्याला दोन जुळी मुले आहेत. त्याच्या पत्नीचे नाव तृप्ती असून राधा आणि मल्हार अशा त्याच्या दोन गोंडस मुलांची नावे आहेत.. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत केळकर