Join us  

छोट्या सुरवीरांना मिळाली 'एकदम कडक' दाद, 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर'च्या टीमकडून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 5:58 PM

'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने म्हणजेच सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे यांनी 'सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर' कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली.

ठळक मुद्दे'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर'मधील कलाकारांनी सांगितला सिनेमाचा अनुभवटीमने स्पर्धकांच्या सादरीकरणाला दाद

कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील छोटे सुरवीर आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली आहे. कार्यक्रमामधील स्पर्धकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडले. वायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत आगामी 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने म्हणजेच सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे यांनी 'सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर' कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खूप किस्से, आठवणी सांगितल्या.

दिवाळी विशेष भागामध्ये देखील कार्यक्रमातील मुलांनी एका पेक्षा एक गाणी लावून प्रेक्षकांना थक्क केले. तसेच कार्यक्रमामध्ये मुलांचे गाणे आवडले की 'एकदम कडक' या शब्दांनी चित्रपटाची संपूर्ण टीम मुलांना दाद द्यायची. मीरा, उत्कर्ष, नेहा केणेने नका सोडून जाऊ, सक्षमने सादर केलेले शूर आम्ही सरदार आम्हाला हे गाणे सादर करून प्रेक्षकांची आणि चित्रपटाच्या टीमची वाहवा मिळवली. तसेच सुबोधने महेश काळे यांना एक गाणे सादर करण्याची विनंती करताच कार्यक्रमामध्ये अजूनच रंगत आली. इतकेच नसून सोनाली कुलकर्णी यांनी मंचावर दोन ओळी सादर केल्या. सुमित राघवन यांनी सई सोबत तेरा मुझसे हे सुंदर गाणे सादर केले. डॉ. श्रीराम लागू यांची व्यक्तिरेखा सुमित राघवने यांनी साकारली आहे याविषयी बोलताना तो म्हणाला,'डॉ. श्रीराम लागू यांची व्यक्तिरेखा मला साकारण्याची संधी मिळाली हे माझ खूप मोठे भाग्य आहे. हे खूप मोठ आव्हान होते माझ्यासाठी. ही भूमिका साकारत असताना मी खूप काळजीपूर्वक एक गोष्ट टाळली ती म्हणजे कुठेच नक्कल केली नाही. तसेच या चित्रपटाबद्दल सांगायचे तर तो सुवर्णकाळ तसेच त्या सुवर्ण क्षणांना पुन्हा एकदा बघण्याची संधी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना मिळणार आहे.'चित्रपटामधील कलाकार त्यांचे अनुभव, या चित्रपटादरम्यानचा त्यांचा प्रवास प्रेक्षकांना सांगणार आहेत. सुबोध भावेने त्याला आलेल्या आव्हानांना पार करून कशी डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली. तसेच सोनाली कुलकर्णी यांनी कशी सुलोचनादीदी यांची भूमिका साकारली तर आनंद इंगळे यांनी कशी वसंत कानेटकर यांची भूमिका वठवली हे प्रेक्षकांना कार्यक्रमाद्वारे कळणार आहे.'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट सर्वत्र ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' चा दिवाळी विशेष भाग 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत ५ नोव्हेंबर पासून रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर पाहता येईल. 

टॅग्स :सूर नवा ध्यास नवाकाशिनाथ घाणेकर