Join us  

"गोरं असणं म्हणजे सुंदर अशी धारणा.."; वर्णभेदावर मिलिंद गवळींनी लिहिलेली नवीन पोस्ट एकदा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:00 AM

मिलिंद गवळींनी गोरा, काळा रंगावरुन माणसांमध्ये जो भेद केला जातो, त्यावर परखड भाष्य करुन त्यांच्या न रिलीज झालेल्या सिनेमातला एक व्हिडीओ शेअर केलाय (milind gawali, aai kuthe kay karte)

'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर विविध विषयांववर पोस्ट करत असतात. नुकतंच मिलिंद यांनी त्यांच्या रिलीज न झालेल्या एका सिनेमातला प्रसंग शेअर केलाय. या सिनेमाचं नाव 'चंचल'. या सिनेमात माणसांच्या रंगावर भाष्य केलंय. हा प्रसंग शेअर करत मिलिंद लिहितात,  "रंग माझा वेगळा" “हम काले है तो क्या हुआ दिलवाले है हम तेरे तेरे चाहने वाले है” “गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण” लहानपणापासून गोरं असणं म्हणजे सुंदर अशी धारणा आजूबाजूच्या लोकांनी करून दिली होती."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "किती छान गोरा आहे वा किती सुंदर गोरी आहे हेच सतत कानावर पडत आलं होतं,फेअर अँड लव्हली चा खप उगाच नाही वाढला आपल्या देशात, हळूहळू जसजसा मी मोठा होत गेलो तसं तसं माझ्या लक्षात आलं, माझी आई तिच्या सगळ्या बहिणींपेक्षा सावळी होती पण ती त्या सगळ्यांपेक्षा खूपच सुंदर होती!माझा खरा रंग कोणता आहे मला पूर्वी शाळा कॉलेजात कधी कळलं नाही, आपल्या चेहऱ्याचा रंग काळा असावा असंच मला वाटत होतं, सतत गोट्या ,भवरे, पतंग, क्रिकेट, सायकल चालवणे, उन्हात भटकणे हाच कार्यक्रम असायचा त्यामुळे, सतत उन्हात रापलेला चेहरा, काळा कुट्ट असायचा, त्यामुळे आई शिवाय दुसरं कोणीही मला ‘तू छान आहेस‘ ‘सुंदर आहेस‘ ‘गोड दिसतोस‘ वगैरे असं कधी कुणी म्हटलं नाही, कदाचित माझ्या आईला माझ्या चेहऱ्यापलीकडचा आतला मनातला रंग दिसत असावा."

मिलिंद गवळी पुढे लिहितात,  "मग मोटरसायकल चालवणं सुटलं आणि हळूहळू माझ्या चेहऱ्याचा रंग उजळत गेला, मग मला कळलं की मी सावळ्या रंगाचा आहे, आणि हाच रंग आपल्या संपूर्ण भारतीयांचा पण आहे, अमेरिकेत युरोपमध्ये गोरे आफ्रिकेमध्ये काळे आणि एशियामध्ये सावळे गव्हाळ रंगाचे माणसं असतात,मग मला कळलं की “beauty lies in the eyes of the beholder “ आणि खरंच रंगावर काहीच नसतंदुबईच्या सिटी मॉलमध्ये उभा असताना मला जगातल्या विविध रंगांच्या लोकांचं दर्शन झालं pink eskimos पाहिली, दुधापेक्षा पांढरीशुभ्र माणसं पाहिली, कोळशापेक्षा काळी कुट्ट माणसे पाहिलेत, जगातल्या वेगळ्या वेगळ्या भागातल्या माणसांची वेगळे वेगळे रंग , आणि सगळ्यांमध्ये आपापले एक वेगळंच सौंदर्य, अदाचीत त्या दिवसापासून मी माझ्या skin मध्ये comfortable आलो, त्या दिवसापासून मी आहे तसा स्वतःला Accept करायला लागलो."

मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "Grass is always greener on the other side , जे सावळे असतात त्यांना गोरं व्हायचं असतं, आणि गोरे लोक tan होण्यासाठी आमच्या गोव्यामध्ये येऊन sunbathing करतात, I think we should accept the way we are, As long as our Skin is healthy and glowing, it does not matter what the colour of your skin is . निरोगी शरीर आणि त्वचा हे सौंदर्याचं रहस्य आहे. ह्या चंचल सिनेमांमध्ये काळ्या गोऱ्या रंगाचाविषय मांडला होता, दुर्दैवाने तो लोकांसमोर आलाच नाही, ही माझी फिल्म रिलीज झालीच नाही."

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजन