Join us

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती-आशुतोषमध्ये बहरतंय नवं नातंं, पाहा हा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 17:16 IST

अरुंधती(Arundhati)ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या मालिकेत आतापर्यंत अनेक रंजक वळणं आली आहेत. अनिरुद्धने अरुंधतीची फसवणूक केल्यानंतर तिच्याळं तील एका नव्या स्त्रीने जन्म घेतला. एक गृहिणी म्हणून कित्येक वर्ष वावरणाऱ्या अरुंधतीने तिच्यातील आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन देशमुख कुटुंबासह संजनालाही दाखवून दिली. त्यामुळे या मालिकेतील अरुंधती या पात्राला विशेष प्रेम मिळत आहे. या मालिकेत आशुतोषची एन्ट्री झाल्यापासून सगळं चित्र पालटून गेलं आहे. सध्या मालिकेत अभि आणि अनघाच्या लग्नाची धामधूम आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. याच दरम्यानचा एक व्हिडीओ अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटरवर तिचा मालिकेतील मित्र आशुतोषबरोबरच्या एका सीनचा क्युट व्हिडीओ शेअर केला आहे. यात आशुतोष अरुंधतीला तिच्या गालावर हळद लागलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तिला हे काळी कळत नाही. मग तो स्वत:च्या गालावर हळद लावून तिला हे समजावण्याचा प्रयत्न करतो. यानंतर अरुंधतीच्या लक्षात येते की आशुतोष नेमकं तिला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. दोघींची व्हिडीओतील केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडते आहे.    जो मित्र नेहमी तुम्हाला हसवतो त्याची कदर करा असे कॅप्शन अरुंधतीने म्हणजेच मधुराणीने दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून दोघांमध्ये एक नवं नातं फुलतं आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय. 

याआधी अरुंधतीच्या हातावर लावलेल्या मेहंदीमध्ये ए असं लिहिलं होतं. एम्हटलं तर अरुंधती, ए म्हटलं तर अनिरूद्ध आणि ए म्हटलं तर आशुतोषही असू शकतं. आता अरूंधतीच्या आयुष्यात अनिरूद्धला काहीच स्थान नसल्यामुळे त्याचा ए नसेल. मग उरलं कोण तर आशुतोष. या फोटोवरून बरेच तर्कवितर्क लावताना दिसत आहे

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारसेलिब्रिटीस्टार प्रवाह