Join us

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत नवा ट्विस्ट, कानेटकरांच्या घरात चोरांचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:21 IST

Thipkyanchi Rangoli : ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पू आणि शशांकच्या नात्यातला दुरावा कमी होतोय.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठिपक्यांची रांगोळीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अप्पू आणि शशांकच्या केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. दरम्यान आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. कानेटकरांच्या घरात चोरांनी धुमाकूळ घातला आहे.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पू आणि शशांकच्या नात्यातला दुरावा कमी होतोय. एकमेकांवरच्या प्रेमाची दोघांना जाणीव होतेय. पुन्हा एकदा नव्याने या दोघांच्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. कानेटकर कुटुंबाने अप्पू-शशांकच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला आहे. लवकरच कानेटकर कुटुंबात दोघांच्या लग्नाची लगबग सुरु होईल. एकीकडे लग्नाची लगबग सुरु असतानाच कानेटकर कुटुंबातील तीन चोरांचा प्रवेश नवी डोकेदुखी ठरणार आहे.

कानेटकर कुटुंबाचे दागिने चोरण्याच्या हेतूने हे तीन चोर दाखल झालेत. शकुंतला, छोटू आणि विनू अशी या तीन चोरांची नावं असून वेडिंग प्लॅनर बनून ते कानेटकरांच्या घरात घुसणार आहेत. आरती सोळंकी, भूषण धुपकर आणि ऋषिकेश वामगुडे हे तीन लोकप्रिय कलाकार या तीन इरसाल चोरांच्या भूमिकेत दिसतील.