Join us  

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये मोठा ट्विस्ट, राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून वाचवणार नेत्रा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:51 AM

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satavya Mulichi Satvi Mulgi) मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून नेत्रा वाचवू शकेल का, हे २१ जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satavya Mulichi Satvi Mulgi) मालिकेनं अल्पावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाले आहेत. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून नेत्रा वाचवू शकेल का, हे २१ जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे.

नेत्राचा रूपालीविषयी संशय वाढल्याने ती घरातल्या सर्वांना रूपालीच विरोचक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. तसेच नागापासून आणि रूपालीपासून सावध रहायला सांगते. विरोचकाचा सेवक असलेला नाग घरातच कुठेतरी असल्यामुळे अस्तिकासुद्धा नाग पकडण्याच्या प्रयत्नात आहे, असं घरच्यांना सांगते. इकडे अस्तिका नागाच्या रूपात घरात सर्व संचार करून राजाध्यक्ष कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. नेत्रा, शेखर आणि इंद्राणीला सांगते, त्रिनयना देवी आणि विरोचकाचं युद्ध जसं त्रेतायुगात झालं होतं. तसं ते कलियुगात नसेल. 

कलियुगात हे युद्ध अतिशय कठीण असणार आहे. कदाचित अस्तिकाचे या घरात येणे, विधिलिखित असेल आणि त्रिनयना देवीनेच तिला इथपर्यंत आणलं असेल, नेत्राचं हे बोलणं अस्तिका नागाच्या रूपात ऐकते. आणि म्हणते, नेत्रा तू चाणाक्ष आहेस, तू बरोबर ओळखलंस आपला संबंध त्रेतायुगातला आहे. नाण्याची एक बाजू तू बरोबर ओळखली आहेस पण दुसरी बाजू ओळखायला तुला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत.

नेत्रा लावणार सर्व शक्ती पणाला

नेत्रा मात्र विरोचकाच्या सेवकापासून राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. तसेच कलियुगातील विरोचकाचा पराभव करण्यासाठी इतर अजून काय मार्ग असू शकतात याविषयी इंद्राणीबरोबर चर्चा करते. आता नेत्रा राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून कशी वाचवते हे आपल्याला महाएपिसोडमध्ये कळणार आहे.