Join us

3819_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:03 IST

सिनेमाला उद्योगाचा दर्जा मिळाला यामुळे सिनेमात अधिकाधिक कलाकारांची मागणी वाढली. स्ट्रगलचा कालवधी कमी झाला व कलाकारांच्या शोध मोहिमेसाठी परदेशी कार्यक्रमांवर आधारीत रिआॅलिटी व टॅलेंट हंट शोंची टीव्हीवर सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या माध्यामातून अनेक चांगले चेहरे व टॅलेंट टीव्ही व सिनेमाला मिळाले आहे. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांनी देखील रिआॅलिटी शोमधूनच आपले करिअर घडविले आहे. अशाच काही रिआॅलिटी शोमधून रिअल स्टारची ही माहिती..

सिनेमाला उद्योगाचा दर्जा मिळाला यामुळे सिनेमात अधिकाधिक कलाकारांची मागणी वाढली. स्ट्रगलचा कालवधी कमी झाला व कलाकारांच्या शोध मोहिमेसाठी परदेशी कार्यक्रमांवर आधारीत रिआॅलिटी व टॅलेंट हंट शोंची टीव्हीवर सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या माध्यामातून अनेक चांगले चेहरे व टॅलेंट टीव्ही व सिनेमाला मिळाले आहे. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांनी देखील रिआॅलिटी शोमधूनच आपले करिअर घडविले आहे. अशाच काही रिआॅलिटी शोमधून रिअल स्टारची ही माहिती..टीव्ही मालिकांतील आघाडीची अभिनेत्री म्हणून बिन्नी शर्मा हीने आपली ओळख निर्माण केली आहे. 20 वर्षीय बिन्नी शर्मा ‘हॅलो प्रतिभा’ या मालिकेत 30 वर्षांच्या महिलेची भूमिका करीत आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तिने स्वत:च्या मनाची चांगलीच तयारी केली आहे. डान्स इंडिया डान्स या रिआलिटी शोमध्ये टॉप 3 स्पर्धकांत सामील असलेली बिन्नी उत्तम डान्सर आहे हे सांगायलाच नको. नाविण्याचा शोध घेणारी बिन्नी स्टेज व डान्स वर्कशॉप करण्याची संधी कधीच सोेडत नाही. हॅलो प्रतिभा ही मालिका श्रीदेवीच्या इंग्लिश-विंग्लिश वर आधारित आहे.रणविजयचे वडील भारतीय सेनेत असल्याने आपला मुलगाही सेनेत अधिकारी व्हावा असे त्यांना वाटत होते. रणविजयने सेनेत जाण्यासाठी परीक्षा दिली, त्यात तो पासही झाला होता, त्याचे मेडिकल टेस्टही झाले होते मात्र त्याच वेळी एमटीव्ही रोेडीजच्या फायनलिस्ट मध्ये त्याची निवड झाली. मिलिट्रीला मागे सोडून या एडव्हेंचरस कार्यक्रमाचा तो विजेता ठरला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एमटीव्हीच्या अनेक कार्यक्रमाचा तो सूत्रसंचालक आहे. मालिका, रिआलिटी शो, सिनेमा, जाहिरात यासर्वच क्षेत्रात त्याने काम केले आहे. देशातील टॉप रिआॅलिटी स्टारमध्ये त्याचा समावेश आहे.शाहीद कपूर-अनुष्का शर्मा यांच्या बदमाश कंपनी या सिनेमात तेनझिंगची भूमिका करणारा मियांग चाँग याने बीडीएसची पदवी मिळविल्यावर गायकीला आपले करिअर बनविण्याचा निर्धार केला. इंडियन आयडलच्या तिस-या सिझनमध्ये टॉप 5 मध्ये असलेल्या या गायकावर चौथ्या सिझनच्या निवेदनाची जबाबदारी सोपविण्यात आली. अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या मियांगने अनेक रिआलिटी शोच्या संचालनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी या सिनेमात त्याने महत्त्वाची भूमिका केली आहे.स्टार वाहिनीवरील ‘ये है महोब्बते’ या सुपरहिट मालिके त दिव्यांका त्रिपाठीने डॉक्टर इशीताची भूमिका केली आहे. सहज अभिनय हे या अभिनेत्रीचे वैशिष्ठ्य ठरले आहे. 2005 साली ‘मिस भोपाल’चा अवार्ड मिळविणारी दिव्यांकाने ‘झी सिने टॅलेंट की खोज’ या कार्यक्रमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. आपल्या अभिनयाच्या बळावर तिने अनेक मालिकांत आपली छाप सोडली आहे. अभिनयाच्या बळावर कमीत कमी कालवधीत आपले स्थान पक्के करून सर्वाधिक टेलिव्हीजन पुरस्कार मिळविण्याचा अनोखा रेकॉर्ड तिच्या नावावर आहे.रेडिओ जॅकी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणा-या आयुष्यमान खुरानाने सुजीत सुकार यांच्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून आपली खास ओळख निर्माण केली आहे. आयुष्यमान केवळ अभिनेताच नाही तर तो एक चांगला निवेदक व गायकही आहे. त्याचा ‘मिट्टी दी खुशब’ हा व्हिडीओ अल्बम सुपरहिट ठरला आहे. एमटीव्ही रोडीज या रिआॅलिटी शोचा तो विजेता ठरला त्यानंतर त्याने या कार्यक्र माला होस्ट केले होते. शाहरुख खान नंतर टीव्ही ते सिनेमा असा यशस्वी प्रवास करणारा पहिला अभिनेता होण्याच मान त्याने मिळविला आहे.