Join us

व्दिशतक साजरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 23:36 IST

आजच्या धावपळीच्या युगात माणसाने हसणे सोडून दिले आहे. परंतु प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सतत कोणती ना कोणती वाहिनी प्रयत्नशील असते. म्हणूनच ...

आजच्या धावपळीच्या युगात माणसाने हसणे सोडून दिले आहे. परंतु प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सतत कोणती ना कोणती वाहिनी प्रयत्नशील असते. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वीकेंडला मराठी प्रेक्षकांना हसत खिळवून ठेवणारी सर्वाची आवडती मालिका म्हणजेच कॉमेडीची बुलेट ट्रेन या मराठी कॉमेडी शोचे नुकतेच २०० भाग पूर्ण झाले आहे. या व्दिशतकाचे सेलेब्रिशन सेटवर जोरदार झालेले दिसते. या शोची खासियत म्हणजे या कॉमेडी शोची सूत्रसंचालक तेजिस्वनी पंडित हिने आपल्या आवाजाने कॉमेडीची बुलेट ट्रेन.... महाराष्ट्रच्या घराघरात पोहोचविली. तर कॉमेडी किंग मकरंद अनासपुरे व स्माइल क्वीन रेणुका शहाणे यांच्या परिक्षणाने व अशुंमन विचारे, पंढरीनाथ कांबळे व सुप्रिया पाठारे यांच्या कॉमेडीने रसिकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.