Join us

'ससुराल सिमर का' मालिकेने केले 2000 एपिसोड पूर्ण, कलाकारांनी सेटवर असे केले सलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 11:55 IST

छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे.मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं,एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक ...

छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे.मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं,एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. मात्र या मालिकांपैकी अगदी मोजक्या मालिका वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड घालतात. अशीच एक मालिका म्हणजे 'ससुराल सिमर का' ही मालिका. ही मालिका गेल्या सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.या मालिकेचे अनेक चाहते आहेत.या मालिकेच्या प्रत्येक कलाकारांना रसिकांनी भरभरून प्रेम दिले.रसिकांनी दिलेल्या प्रेमामुळेच आता 'ससुराल सिमर का' मालिकेने 2000 एपिसोड्सचा पल्ला गाठला आहे.मालिकेत अनेक कलाकारांची रिप्लेसमेंट झाली असली तरी ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे.'ससुराल सिमर का' रसिकांचा निरोप घेणार असल्याच्याही वावड्याही उठल्या होत्या. मात्र त्या फक्त अफवाच राहिल्या.दिवसेंदिवस मालिकेत येणारे रंजक वळणांमुळे मालिकेशी रसिकही गेल्या अनेक वर्षापासून खिळुन आहेत. रसिकांच्या प्रेमामुळेच आज ही मालिका 2000 एपिसोड्सचा टप्पा गाठले असून रसिकांनी असेच प्रेम करत राहा असे मालिकेच्या टीमने सांगितले.मालिकेच्या सेटवर सगळ्या कलाकरांनी केक कटींग करत जल्लोषात सेलिब्रेशन केले.याआधी 'बालिका वधू' आणि 'साथ निभाना साथिया' या मालिकेनंही 2 हजार भागाचा टप्पा गाठला होता.नुकतेच 'ये रिश्ता क्या कहलाता है'  मालिकेनं अडीच हजार भागपूर्ण केले आहेत. आता या यादीत 'ससुराल सिमर का'मालिकेनेही स्थान मिळवले आहे.या मालिकेनं सातत्यानं टीआरपीमध्येही अव्वल स्थान मिळवलं आहे.इतर मालिकांप्रमाणे मालिकेनं अनेक चढउउतार पाहिले असले तरी रसिकांना जे आवडतं ते दाखवून त्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरल्याबद्दल निर्मात्यांनी आनंद व्यक्त केला आहे.Also Read:'ससुराल सिमर का'मालिकेतील ही अभिनेत्रीची 'अग्नीफेरा' मालिकेत होणार एंट्री,बोल्ड फोटोशूटमुळे आली होती चर्चेत!ससुराल सिमर का या मालिकेतून किर्तीचं तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन होतंय. 'ससुराल सिमर' का मालिकेतील प्रमुख अभिनेत्री दीपिका कक्कड या मालिकेतून एक्झिट घेतली.दीपिकाची रिप्लेसमेंट म्हणून अभिनेत्री किर्ती गायकवाड केळकरने नवीन सिमर बनत सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एंट्री केली.सात फेरे, छोटी बहू आणि डान्स रियालिटी शो नच बलियेमध्ये पाहिलंय. अनेक मालिकांमध्ये किर्तीने निगेटिव्ह शेड असलेल्या भूमिकाही साकारल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून किर्तीला छोट्या पडद्यावर कमबॅक करायचे होतं. मात्र किर्ती एका चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होती. त्या दरम्यान सिमर भूमिकेसाठी तिला विचारण्यात आल्यावर तिने या मालिकेला क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार दिला होता.