“घाडगे & सून” मालिकेचे २०० भाग पूर्ण, मालिकेत येणार 'हा' ट्वीस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 16:27 IST
घाडगे सदन मध्ये काकु आल्यामुळे खूपच आनंदाचे वातावरण आहे.परंतु वसुधाच्या हाती अक्षय आणि अमृताच्या घटस्फोटाचे कागदपत्र लागल्यामुळे ती आता ...
“घाडगे & सून” मालिकेचे २०० भाग पूर्ण, मालिकेत येणार 'हा' ट्वीस्ट!
घाडगे सदन मध्ये काकु आल्यामुळे खूपच आनंदाचे वातावरण आहे.परंतु वसुधाच्या हाती अक्षय आणि अमृताच्या घटस्फोटाचे कागदपत्र लागल्यामुळे ती आता लवकरच माईना हे सगळं सांगणार अशी अमृताला वाटत असणारी भीती सत्यात उतरणार कि काय? कारण,वसुधा हे अक्षय अमृताच्या नात्याचं खरं आणि घटस्फोटाचं कटू सत्य माईना सांगणार आहे. पण, हे माईना कळल्यावर अक्षय आणि अमृताला घराबाहेर काढणार का? काकू यामधून कसा सुवर्णमध्य साधतील ? अक्षय आणि अमृता मध्ये कायमचा दुरावा खरोखरच येणार का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच घाडगे & सून मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये मिळणार आहेत.“घाडगे & सून” ही मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक,कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता २०० भागांचा पल्ला गाठला आहे.घाडगे सदनमध्ये गुढीपाडवा आनंदात पार पडला. वसुधाच्या हाती लागलेल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांनी आता ती नातं तोडेल का ही भीती अमृताच्या मनात अजूनही आहे. आता मालिकेमध्ये बऱ्याचश्या घटना बघायला मिळणार आहेत.कारण,घाडगे सदनमध्ये येणार आहेत जेजुरीच्या काकू. काकुंच्या येण्याने सगळ्यांचाच आनंद द्विगुणीत होणार हे नक्की. पण, वसुधाच्या मनामध्ये काही वेगळचं आहे. अमृता – अक्षयच्या नात्याला पूर्णत: तोडण्याच्या मनसुब्यामध्ये वसुधाला यश येणार का ? कि, काकुंच्या येण्याने अक्षय – अमृताच्या नव्या नात्याचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होणार ? हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.“घाडगे & सून” मालिकेमध्ये प्रत्येकच सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे. मग दिवाळी असो वा होळी – रंगपंचमी असो. आता घाडगे सदन मध्ये तयारी सुरु झाली आहे ती गुढीपाडवाची... अक्षय आणि अमृताचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा असल्याने घाडगे परिवार हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार यात शंका नाही. गुढी म्हणजे आनंदाच प्रतिक. या दिवशी शुभकार्याचा प्रारंभ करण्याची प्रथा आहे. आपल्या कुटुंबांचे सर्व संकटापासून संरक्षण करण्यासाठी गुढी भारली जाते. अक्षय आणि अमृता यावर्षी गुढी उभारणार असून माई स्वत: श्रीखंड, पुरणाची पोळी करणार आहेत.गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या लाडक्या अक्षय आणि अमृताने या दिवसाच्या काही आठवणी सांगितल्या.