Join us  

तारा सिंगचा पाकिस्तानात पुन्हा एकदा 'गदर', सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 6:50 PM

Gadar 3 : 'गदर २' नंतर चाहत्यांनी निर्मात्यांना 'गदर ३' बनवण्याची मागणी केली होती. आता 'गदर ३' संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

अभिनेता सनी देओल(Sunny Deol)च्या 'गदर २' (Gadar 2) या चित्रपटाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित रेकॉर्ड्स केले होते. ११ ऑगस्ट, २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल शर्माच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा फार लवकर पार केला. गदर हा चित्रपट सनी देओलच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या सिनेमाने त्यांच्यासाठी सिनेजगताचे  दरवाजे पुन्हा उघडले. गदर २ नंतर चाहत्यांनी निर्मात्यांना 'गदर ३' (Gadar 3) बनवण्याची मागणी केली होती.

रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी गदर ३ ची कथा कशी असेल यावर एक मूळ कल्पना लॉक केली आहे, परंतु त्याच वेळी त्यांनी सनी देओलच्या पात्रासंदर्भात एक विशेष गोष्ट लक्षात ठेवली आहे. २००१ मध्ये रिलीज झालेल्या 'गदर-एक प्रेम कथा'ची कथा १९४७ ते १९५४ या काळातील भारत आणि पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित होती. यानंतर १९७१ मध्ये घडलेली घटना गदर २ मध्ये दाखवण्यात आली होती. गदर ३ ची माहिती समोर आली तेव्हा असे सांगण्यात आले की हा भाग १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दर्शवेल.

आता बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, निर्माते गदर ३ आणि गदर २ च्या कथेमध्ये फारसे टाइमलाइन अंतर दाखवणार नाहीत. वृत्तानुसार, निर्मात्यांना विश्वास आहे की तारा सिंगच्या पात्रासह ते प्रेक्षकांसमोर असे काहीही सादर करणार नाहीत जे तर्कसंगत वाटत नाही. तारा सिंग इतकी वर्षे तरुण कसे राहिले, असा प्रश्न लोकांना पडू नये. असाही दावा करण्यात आला आहे की गदर ३ मध्ये निर्माते १९८० ते १९९९ मधील कथा सांगू शकतात.

'गदर ३'मध्ये दिसणार हे कलाकाररिपोर्ट्सनुसार, सनी देओल व्यतिरिक्त गदर ३ मध्ये अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्याही भूमिका असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गदरच्या निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची मूळ कथा लॉक केली आहे. चित्रपटाचा तिसरा भागही देशभक्तीच्या भावनांनी परिपूर्ण असणार आहे. गदर ३ चे शूटिंग २०२५ मध्ये सुरू होऊ शकते.

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेल