Join us

'तान्हाजी' सिनेमात सोयराबाई बनलेल्या 'या' अभिनेत्रीचे हे फोटो तुम्ही पाहिले का? एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:20 IST

इलाक्षीदेखील आगामी काळात आपला सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार असेच दिसतंय.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘तान्हाजी’ची घौडदौड सुरूच आहे. ‘तान्हाजी’ हा सिनेमा यंदाचा 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल, असे दिसतेय. सिनेमातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकांना रसिकांनी  पसंती दिली.  सिनेमातील सोयराबाई या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री इलाक्षी गुप्ताची भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी ठरली. 

सध्या ती कामातून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. श्रीलंका येथे ती क्वॉलिटी टाईम एन्जॉय करते. तान्हाजी सिनेमामुळेच इलाक्षी प्रकाशझोतात आली. तिने याच सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात केली. 'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा आहे. सिनेमात रसिकांनी तिला मराठमोळ्या अंदाजात पाहिले आणि आता तिला अतिशय ग्लॅमरस अंदाजात पाहून तिच्यावर फिदा होताना दिसत आहे. जितकी चर्चा तिच्या ऑनस्क्रीन लूकची झाली तितकीच ऑफस्क्रीन लूकचीही होत आहे. 

 

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. त्यामुळे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे आगामी काळात इतर अभिनेत्रींप्रमाणे इलाक्षीदेखील आपला सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि तसेच लक्षवेधी स्टाईल यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार हे मात्र नक्की.

टॅग्स :तानाजी