Join us  

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात तैमूरच ‘सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन’; फोटोग्राफर्सना टशन, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:46 PM

Ranbir Alia Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाह सोहळ्यातील तैमूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुंबई: बॉलिवूडमधील दोन स्टार किड्स लग्नाच्या बेडीत अडकले. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह अतिशय थाटात पार पडला. मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघांनी आपले नाते अधिकृत केले आहे. वास्तू बंगल्यात दोघेही विवाहबद्ध झाले. मात्र, या विवाह सोहळ्यात चर्चा होती ती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना यांचा मुलगा तैमूरची. या विवाह सोहळ्यात तैमूरने हजेरी लावली होती. 

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाह सोहळ्यातील तैमूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तैमूरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओत तैमूर वडील सैफसोबत दिसत आहे. तैमूर हातातील मोबाइलमध्ये काहीतरी बघत चालत होता. त्यानंतर तो फोटोग्राफर्सवर चिडला आणि त्याने त्यांच्यावर हात उचलला. 

करीना-सैफ सोशल मीडियावर ट्रोल

तैमूरचा हा राग पाहिल्यानंतर सोशल मीडियावर करीना आणि सैफ ट्रोल करण्यात येत आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “आता पासून फोन वापरायला दिला.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तैमूरला शिष्टाचार किंवा समाजात वागण्याची पद्धत शिकवा असा सल्ला दिला आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “आतापासून ही परिस्थिती आहे, मग पुढे जाऊन काय करणार?” आणखी एक नेटकरी म्हणाला, “हात कोणावर उचलला सैफवर?”

दरम्यान, आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जातात. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आले होते. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण अखेर दोघेही लग्नबंधनात अडकले.

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठतैमुरसैफ अली खान करिना कपूररणबीर कपूरआलिया भटबॉलिवूडसेलिब्रिटी