Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg boss 12 : तब्बू, आयुषमान खुराणा आणि सलमान खानसोबत असा रंगला विकेंड का वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 22:30 IST

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना एक सुखद धक्का देण्यासाठी आयुषमान बिग बॉसच्या घरात गेला होता. अंधाधूद या चित्रपटाच्या नावावरून बिग बॉसच्या स्पर्धकांना घरातील अंधाधून फॉलोव्हर कोणता स्पर्धक आहे हे आयुषमानने विचारले.

बिग बॉस 12 या कार्ययक्रमाच्या विकेंड का वारमध्ये कोणता स्पर्धक घरातून बाहेर जाणार याची सगळ्याच घरातल्यांना उत्सुकता लागलेली होती. पण त्याच दरम्यान सलमान खानने स्पर्धकांना एक खूप छान सरप्राईज दिले. अंधाधून या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री तब्बू आणि आयुषमान खुराणा यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते बिग बॉसच्या घरात आले होते आणि त्यांनी स्पर्धकांना काही टास्क देखील दिले होते.

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना एक सुखद धक्का देण्यासाठी आयुषमान बिग बॉसच्या घरात गेला होता. अंधाधूद या चित्रपटाच्या नावावरून बिग बॉसच्या स्पर्धकांना घरातील अंधाधून फॉलोव्हर कोणता स्पर्धक आहे हे आयुषमानने विचारले. आयुषमानने हा प्रश्न विचारल्यावर प्रत्येकजण आपले मत व्यक्त करत होते आणि त्याचवेळी अनेक स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप केले आणि त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले यात काहीच शंका नाही. एवढेच नव्हे तर यानंतर आयुषमानने स्पर्धकांना आणखी एक गोष्ट करायला सांगितली. त्याने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना विचारले की, घरातील सर्वात मनोरंजक स्पर्धक कोण आहे आणि सगळ्यात कमी मनोरंजन करणारा स्पर्धक कोण आहे. 

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आयुषमान आणि तब्बू यांनी सलमानसोबत बिग बॉसच्या स्टेजवर खूप मजा मस्ती केली. हँगओव्हर या सलमानच्या प्रसिद्ध गाण्यावर ते तिघे थिरकले. त्यांचा हा अफलातून परफॉर्मन्स सगळ्यांनाच आवडला. त्यानंतर तब्बूला सलमानने एक काम दिले होते. स्पर्धकांशी निगडित असलेल्या काही वस्तू त्याने तब्बूला विकायला सांगितल्या आणि तब्बूनेदेखील हे आव्हान स्वीकारले आणि सगळ्या वस्तू विकल्या. त्यानंतर दर आवड्याप्रमाणे सलमानने बिग बॉस मधील स्पर्धकांची शाळा घेतली. प्रत्येकाने खेळ सकारात्मक पद्धतीने खेळावा असे त्याने सगळ्यांना सांगितले. काही जोड्यांना आणि काही सिंगल स्पर्धकांना त्याने त्यांच्यावर असलेले आरोप सांगितले आणि या आरोपांवर त्यांची बाजू देखील ऐकून घेतली. सलमानसोबत गप्पा मारून सगळ्याच स्पर्धकांना प्रचंड आनंद झाला होता.  

टॅग्स :बिग बॉस 12सलमान खानआयुषमान खुराणातब्बू