Join us  

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने नाकारली होती 'जेठालाल'ची भूमिका, आता म्हणतोय, 'अजिबात पश्चात्ताप नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 3:54 PM

जेठालालच्या भूमिकेसाठी दिलीप जोशी नाही तर तर एका बॉलिवूड अभिनेत्याला पहिली पसंती होती.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे खरंतर सर्वच पात्रांना प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यातही 'जेठालाल' म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. जेठालाल गडाची फॅमिली नेहमीच चर्चेचा विषय ठरली. पण तुम्हाला माहितीये का जेठालालच्या भूमिकेसाठी दिलीप जोशी नाहीतर तर एका बॉलिवूड अभिनेत्याला पहिली पसंती होती.

राजपाल यादवने नाकारली होती जेठालालची भूमिका 

लोकप्रिय कॉमेडियन राजपाल यादव (Rajpal Yadav) यांना कोण ओळखत नाही. चित्रपटातील त्यांच्या विनोदी भूमिका नेहमीच गाजतात. भुलभुलैय्या, गरम मसाला, छुप छुपके, भागमभाग, ढोल यासारख्या अनेक सिनेमात राजपाल यादवच्या कॉमेडीची जादू चालली. त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. राजपालला जेव्हा जेठालालच्या या आयकॉनिक भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा त्याने भूमिका करण्यास साफ नकार दिला होता.

जेठालाल भूमिका नाकारण्याचा पश्चात्ताप नाही

प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट सिद्धार्थ कननच्या मुलाखतीत राजपाल यादवने खुलासा केला की त्याला जेठालालची भूमिका ऑफर करण्यात आली होती. त्याने भले ही भूमिका नाकारली असली तरी त्याला याचा काहीच पश्चात्ताप नाही.तो म्हणाला, 'जेठालाल या पात्राची ओळख एका चांगल्या कलाकाराकडून झाली आणि मी प्रत्येक पात्राला कोणा एका कलाकाराचंल पात्रच मानतो.'

राजपाल पुढे म्हणाला, 'हे एक मनोरंजनाचे मार्केट आहे. मी कोणा एका पात्रात माझ्या पात्राला फिट नाही बसवणार. त्यामुळे मला असं वाटतं जे पात्र बनले ते राजपालसाठी बनले ते मला करण्याचे सौभाग्य मिळाले, पण कोणा दुसऱ्यासाठी असलेल्या भूमिका मला मिळू नये.

 

टॅग्स :राजपाल यादवतारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजन