Join us

तारक मेहता...मधील या कलाकाराची बिल्डिंग करण्यात आली सील, तो देखील राहाणार क्वॉरंटाईनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 12:06 IST

या कलाकाराच्या बिल्डिंगमध्ये तीन जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.

ठळक मुद्देतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत बाघाची भूमिका तन्मय वेकारिया साकारत आहे. तन्मयच्या बिल्डिंगमध्ये काही पॉझिटिव्ह रुग्ण आढल्यामुळे त्याची बिल्डिंग सील करण्यात आली आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. एखाद्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे. आता तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील एका कलाकाराची संपूर्ण बिल्डिंगच सील करण्यात आली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत बाघाची भूमिका तन्मय वेकारिया साकारत आहे. तन्मयच्या बिल्डिंगमध्ये काही पॉझिटिव्ह रुग्ण आढल्यामुळे त्याची बिल्डिंग सील करण्यात आली आहे. तन्मय कांदिवलीमधील राज अपार्टमेंटमध्ये राहातो. त्याच्या बिल्डिंगमध्ये तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याची बिल्डिंग सील करण्यात आली असून कोणालाही बिल्डिंगच्या बाहेर जायची परवानगी नाहीये. 

याबाबत तन्मयने सांगितले की, माझ्या कुटुंबियांतील सगळीच मंडळी घरीच आहेत. सगळ्यांसाठी हा एक अतिशय कठीण प्रसंग असून आम्ही सगळेच खूप घाबरलेलो आहोत. घराच्या बाहेर पडायला देखील आम्हाला भीती वाटत आहे. आता या परिस्थितीत तर सगळ्यांनी घरीच राहाण्याची गरज आहे. या सगळ्यात बीएमसीमधील मंडळी प्रचंड मदत करत आहेत. संपूर्ण बिल्डिंग ते सॅनिटाईज करत आहेत. आमच्या बिल्डिंगच्या जवळ असलेल्या एका भाजीवाल्याला देखील कोरोनाची लागण झालेली आहे. मी कधीच थेट या भाजीवाल्याच्या संपर्कात आलेलो नाहीये. पण तरीही मी दोन आठवड्यांसाठी स्वतःला क्वॉरंटाईन करण्याचे ठरवले आहे.   

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा