Join us
Daily Top 2Weekly Top 5

तापसी पन्नूने सुरु केली 'रश्मि रॉकेट'ची शूटिंग, शेअर केला फर्स्ट लूक

By गीतांजली | Updated: November 9, 2020 16:35 IST

हे. तापसीने 'रश्मी रॉकेट' सिनेमाच्या शूटिंग सुरूवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर आगामी सिनेमा 'रश्मि रॉकेट'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तापसीने 'रश्मी रॉकेट' सिनेमाच्या शूटिंग सुरूवात केली आहे.

तापसीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना लिहिले, "चला करुया, रश्मि रॉकेट". या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला कंपनी 'आरएसव्हीपी' च्या बॅनरखाली केली जात आहे. चित्रपटाचे शूटिंग मागील आठवड्यात सुरू झाले आहे. आकर्ष खुराना यांनी त्याचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात 'एक्सट्रैक्शन' फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

कच्छच्या रणापासून सुरुवात करून, रश्मि रॉकेट एका गावकरी तरुणीची कथा आहे, जिच्याकडे, वेगवान धावण्याची शक्ती आहे. ती एक अविश्वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला 'रॉकेट' म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटि प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते. 'रश्मि रॉकेट' 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

टॅग्स :तापसी पन्नू